वैशाली या गाण्यातून पहिल्यांदाच निर्माती म्हणून समोर आली आहे. दरम्यान गाण्याची निर्मिती करत असताना वैशाली सगळ्या कलाकारांची कशी काळजी घेतली हे सांगत वैशालीचं कौतुक केलं. तेव्हा अभिजीत म्हणाला, ‘भविष्यात निर्मिती क्षेत्रात आलो तर आपलं स्वत:चं प्रोडक्शन हाऊस कसं असावं असं वाटलं तर याचं उत्तम उदाहरण वैशाली ताईचं पहिलं प्रोडक्शन हाऊस आहे. तिने आम्हाला दोन दिवसांपासून खायला पाहिजे, कॉफी कुठली पाहिजे अशा आवडीनिवडी विचारुन अनेक प्रश्न विचारले. घरी आलेल्या पाहुण्यांप्रमाणे तिने आमची खूप काळजी घेतली’.
हेही वाचा – Sukh mhnaje nakki kay asta : अखेर शालिनीच्या पापांचा घडा भरणार; जयदीप गौरी देणार ‘ही’ शिक्षा
याविषयी सुखदा म्हणाली, ‘शुटच्या दरम्यान ती आमची इतकी काळजी घेत होती की एका पाइंटनंतर आम्हाला नाही बोलणं कठीण झालं. मग मी गमतीत ड्रॅगन फ्रुट स्मुधी मागवं असं वैशालीला म्हटलं. तेव्हा काही ते मिळालं नाही. पण पंधरा दिवसांनी माझ्या घरी ड्रगन फ्रुट्स पाठवून दिले होते. मी तिला विचारलं असं का केलं तर त्यावर ती म्हणाली, ड्रगन स्मुधी नाही मिळाली ना म्हणून फ्रुट्स पाठवले.
पुढे अभिजीत म्हणाला, ‘मला आता वैशाली सामंतची भिती वाटू लागली आहे. ड्रगन स्मुथी वरुन तिनं ड्रगन फ्रुट्स घरी पाठवले. आता काही दिवसांनी खरा खुरा ड्रगनच घरी पाठवेल. म्हणजे दार उघडलं की ड्रगन दारात उभा आणि म्हणेल वैशाली सामंत यांनी पाठवलंय’. अभिजीतच्या या अतिशयोक्तीनं सगळेच हसू लागले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या