हे गाणं गायलंय गायिका वैशाली सामंत हिनं. ऑफिसमधला प्रसंग यात आहे. बाॅस आहे अभिजीत खांडकेकर. त्याचं आपल्याकडे लक्ष जावं म्हणून सुखदा प्रयत्न करतेय, अशी ही संकल्पना आहे. टी सीरिजनं हा अल्बम आणलाय.
प्राजक्ता माळीची इच्छा झाली पूर्ण, सोशल मीडियावर Photo शेअर करत व्यक्त केला आनंद
या गाण्याबद्दल गायिका वैशाली सामंत म्हणाली, ‘जेव्हा तुम्ही नाॅन फिल्मी गाणं गाता, तेव्हा आपल्याला त्यात स्वातंत्र्य घेता येतं. पण जबाबदारीही मोठी असते. गाणं हा माझ्यासाठी एक दागिना आहे. त्याची जडण घडण गायकालाच करावी लागते.’ वैशाली पुढे म्हणाली, ‘सांग ना गाण्यात प्रेयसी प्रियकराला आर्जवं करते. ते व्यक्त होणं मला आवडलं. त्याचा ठेका आवडला.’
अभिजीत खांडकेकर या गाण्याबद्दल म्हणाला, ‘मी आणि सुखदानं एकत्र येऊन कलाकृती सादर करावी अशी चाहत्यांची इच्छा होती. या अल्बममुळे ती पूर्ण झाली आहे. मी वैशाली सामंत यांचा मोठा फॅन आहे. त्यांनी गायलेली बरीच गाणी हिट झाली आहेत. हेही गाणं रसिकांना आवडेल. मला आणि सुखदाला एकत्र शूटिंग करताना छान वाटलं.’
अभिजीतची दुरंगा वेब सीरिज गेल्या महिन्यात ओटीटीवर आलीय. पहिल्यांदा तो वेब सीरिजमध्ये झळकतोय. यात तो क्राइम रिपोर्टरची भूमिका करतोय. कोरियन मालिका फ्लाॅवर ऑफ इव्हिलचा हा रिमेक आहे.
Poll- TRP लिस्टमध्ये झी मराठीला दिसणार का सुगीचे दिवस?
माझ्या संपूर्ण अंगाला काळा मेकअप लावला जायचा; आशयनं सांगितला टॅन मेकअपचा किस्सा
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या