मीडिया रिपोर्ट्सनुसार, महेश बाबूसोबत एसएस राजामौलीच्या ‘SSMB29’ चित्रपटासाठी आलिया भट्टला अप्रोच करण्यात आले आहे. आलियाच्या प्रसूतीनंतर लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. या बातमीने आलियाचे चाहते खूपच खूश आहेत. राजामौली यांच्या चित्रपटात आलियाला पुन्हा एकदा पाहण्यासाठी लोक नक्कीच उत्सुक आहेत. याशिवाय महेश बाबू आणि आलियाची फ्रेश जोडी देखील प्रेक्षकांच्या आनंदाचे कारण आहे. मात्र, या चित्रपटाच्या कलाकारांबाबत निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
हेही वाचा – VIDEO : गरोदरपणातही Alia Bhatt चं काम पाहून चाहते थक्क; म्हणाले ही तर ‘बॉस लेडी’
हा चित्रपट आलियासाठी टॉलिवूडमधील परफेक्ट डेब्यू ठरेल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. याआधी तिने राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातही काम केले होते, परंतु त्यामध्ये अभिनेत्रीची भूमिका खूपच छोटी होती. ही बातमी खरी ठरली तर आलिया महेश बाबूसोबत मुख्य अभिनेत्री म्हणून काम करणार आहे. दुसरीकडे, महेशसाठी हा हिंदीमध्ये एक परिपूर्ण पदार्पण असेल तसेच हा चित्रपट हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे.
तसेच आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीबद्दल बोलायचं झालं तर अभिनेत्रीची डिलिव्हरी डिसेंबरच्या शेवटी होऊ शकते. नीतू कपूर आणि आलियाची आई सोनी राजदान आलियासाठी खास लेडीज बेबी शॉवर आयोजित करणार आहे. याशिवाय, वर्क फ्रंटवर, आलियाने तिच्या पहिल्या हॉलीवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन्स’चे शूटिंग पूर्ण केले आहे ज्यामध्ये ती गॅल गॅडोट सोबत दिसणार आहे. तसेच आलिया करण जोहरच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे.
Published by:Nishigandha Kshirsagar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या