गरोदरपणातही Alia Bhatt चं काम पाहून चाहते थक्क; म्हणाले ही तर ‘बॉस लेडी’

मुंबई, 17 सप्टेंबर : अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’, 2022 मधील चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.  ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. या चित्रपटाने आठ दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर 183.82 कोटींची कमाई केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. आलिया सध्या गरोदर असूनही खूप हार्ड वर्क करत असल्याचं दिसत आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिच्यावर कौतुकाचाै वर्षाव होतोय.

आलिया भट्ट गरोदरपणातही पूर्ण उत्साहाने काम करतेय. हे पाहून तिचे चाहते खूप आनंदी आणि प्रभावित झाले आहेत. चाहत्यांचे म्हणणे आहे की, ‘इंडस्ट्रीत अशा खूप कमी अभिनेत्री आहेत, ज्यांनी गरोदरपणातही खूप काम केले आहे. आता या यादीत आलिया भट्टच्या नावाचाही समावेश झाला आहे’. आलियाचा नवा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओवर बॉस लेडी, हार्डवर्किंग लेडी, अशा अनेक कमेंट येत आहेत. आलिया भट्ट बॉलिवूडच्या स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. त्याचबरोबर तिने गरोदरपणात ज्या प्रकारचे कपडे घातले आहेत, त्याचे कौतुक चाहत्यांकडून होतंय. तिला पाहून अनेकांना फॅशन टीप्स मिळाल्या असल्याचं म्हटलं जातंय.

हेही वाचा –  Jacqueline Fernandez आणि महाठग सुकेश चंद्रशेखरच्या नात्याचा अखेर खुलासा; समोर आलं सत्य

दरम्यान, 14 एप्रिल रोजी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी घरात एका खाजगी समारंभात लग्न केले. यामध्ये केवळ मित्र आणि कुटुंबीयांचा सहभाग होता. यानंतर आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने गरदोरपणाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. या बातमीने दोघांच्याही चाहत्यांना सुखद धक्काच बसला.

Published by:Sayali Zarad

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

सलमानच्या १५० एकरात पसरलेल्या अलिशान फार्महाऊसची किंमत आहे तरी किती?

Salman Khan Panvel Farm House: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता सलमान खानला त्याच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर …

Amitabh Bacchan ने पुन्हा खरेदी केलं आलिशान घर; किंमत ऐकूण डोळे होतील मोठे

मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोमुळे खूप चर्चेत …