ओव्हरसीज सेन्सॉर बोर्डाचे सदस्य उमेर संधू यांनी सेन्सॉर रूममध्ये हा चित्रपट पाहिला आणि याविषयी रिव्ह्यूही दिला आहे. ब्रह्मास्त्र पाहिल्यानंतर सोशल मीडियावर आपले मत शेअर करताना उमीर संधूने लिहिले की, ‘रणबीर कपूर चित्रपटात खूप गोंधळलेला दिसत आहे. काय चाललंय ते त्याला कळतही नाही. आलिया भट्ट या चित्रपटात स्टनिंग दिसत आहे. मौनी रॉय खूप क्रूर दिसत असून तिच्या अभिनय खूप जोरदार आहे. अमिताभ बच्चन पूर्ण प्रतिष्ठेत आहेत. फक्त दुःख याच गोष्टीचं वाटतंय की, त्यांना कमी फुटेज मिळालं आहे’.
#RanbirKapoor looking so confused in #Brahmastra ! He even didn’t know what’s going on ! #Aliabhatt looking stunning in movie ! Wow ! #MouniRoy looking so creepy! Loud performance by her ! #AmitabhBachchan is grace personified. The only regret is, he gets less footage.
— Umair Sandhu (@UmairSandu) September 6, 2022
उमेर संधूने पुढच्या ट्विटमध्ये लिहिलं की, ‘बॉलिवुडमध्ये काल्पनिक साहसी चित्रपट दुर्मिळ आहेत. असा चित्रपट बनवला यासाठी तुम्ही आयान मुखर्जूला प्रोत्साहित करु शकता. चित्रपटाची पटकथा आणि कथा एकदम सरासरी आणि कधी कधी वाईट आहे. उमेर संधूने या चित्रपटासाठी 2.5 स्टार दिले आहेत’.
Fantasy/adventure films are a rarity in Bollywood. Actually, you want to laud #AyanMukerji for being courageous, for venturing into a lane that’s rarely visited by dream merchants here. But the screenplay & story is a complete average & sometimes mess in #Brahmastra ! 2.5⭐️/5⭐️
— Umair Sandhu (@UmairSandu) September 6, 2022
दरम्यान, भारतातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटावर खूप मेहनत घेतली गेली असली तरी, बराच काळ पैसा पाण्यासारखा वाहून गेला आहे. अशा परिस्थितीत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Published by:Sayali Zarad
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या