‘ब्रह्मास्त्र’नं रचला इतिहास, बाॅलिवूडचा सर्वात महागडा सिनेमा, बजेटचा आकडा इथे वाचा

मुंबई : सध्या बाॅक्स ऑफिसचं काही खरं नाही. मोठमोठ्या बजेटचे सिनेमे फ्लाॅप होतायत. लाल सिंह चड्ढा, रक्षाबंधन हे अलिकडचे सिनेमे दणकून आपटले. आता पुढच्या आठवड्यात ब्रह्मास्त्र रिलीज होत आहे. या सिनेमाचं बजेटही प्रचंड आहे.

सर्वात महागडा सिनेमा
ब्रह्मास्त्र सिनेमाचं काऊंट डाऊन सुरू झालं आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत बिग बी, नागार्जुन आणि मौनी राॅय यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. जवळ जवळ ८ वर्ष या सिनेमाची चर्चा सुरू होती. आता रिलीजसाठी उरलेत ८ दिवस. सिनेमाचं बजेट आहे ४१० कोटी रुपये. हा या सिनेमाचा पहिला भाग आहे. अजून २ भाग बाकी आहेत.

गणपतीचे असे फोटो शेअर करत प्रकाश राजनी विचारलं, आता तुमच्या भावना दुखत नाहीत का?

पाच भाषांमध्ये रिलीज होणार सिनेमा
हिंदीबरोबर एसएस राजामौली हा सिनेमा तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये सादर करणार आहेत. त्यामुळे सिनेमाला मोठा प्रेक्षक मिळण्याची आशा निर्मात्यांना आहे. सिनेमाचं प्रमोशनही जोरदार सुरू आहे.

नवनवे टीझर येतायत समोर
नुकताच या सिनेमाचा नवा टीझर प्रदर्शित केला. या टीझरमध्ये फक्त अमिताभ बच्चन आहेत. ते हातात प्रकाश घेऊन लढत आहेत. हातात शस्त्र, दमदार अभिनय, चपळता हे सगळं वयाच्या ८० व्या वर्षी पाहून चाहते खूप कौतुक करत आहेत करण जोहरनं हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं आहे, भेटा गुरू आणि त्यांच्या प्रभास्त्रला ९ दिवसात.

ब्रह्मास्त्र सिनेमात शाहरुख खान खास पाहुण्या कलाकाराची भूमिका करणार असल्याची चर्चा होती. पण सिनेमाच्या टीमने त्याबाबत काहीच उघड केलं नव्हतं. आता एका सीनमध्ये वानरास्त्रच्या रूपातील पात्र आगीच्या गोळ्याशी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यातील कलाकार शाहरुखसारखाच दिसत असल्याचं बोललं जातंय.

सलमान खानच्या ‘बिग बाॅस १६’मध्ये नुसरत जहां? खासगी गोष्टींचा होईल उलगडा

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous Indian Navy : भारतीय नौदलाला मिळाला नवा ध्वज, पंतप्रधान म्हणाले, ‘हा ध्वज शिवरायांना समर्पित’
Next विनोद कांबळीची अडचण दूर, एक लाख पगाराच्या ऑफर लेटरसह कंपनीचे चेअरमन थेट घरी

Check Also

‘या’ कारणामुळे हृताला कधीच करायचं नाहीये नवऱ्यासोबत काम

मुंबई, 21  सप्टेंबर : अभिनेत्री हृता दुर्गुळे अवघ्या महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जाते. हृतासाठी 2022  …

हार्ट अटॅक, ब्रेन डेड आणि मृत्यू; असे होते Raju Srivastav यांचे शेवटचे काही दिवस

मुंबई, 21 सप्टेंबर : आज म्हणजे 21 सप्टेंबरला कॅमेडी किंग राजू श्रीवास्तव यांनी AIIMS रुग्णालयात …