करण जोहरनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात म्हटलंय, भारतीय सिनेमाचे Man of Masses ज्युनियर एनटीआर ब्रह्मास्त्रच्या मोठ्या प्री रिलीज इव्हेंटला शोभा वाढवतील. हा इव्हेट २ सप्टेंबरला हैदराबाद इथे होणार आहे. त्यावेळी ज्युनियर एनटीआर मुख्य गेस्ट असणार आहे.
KBC स्पर्धकानं कार्यक्रमातच उतरवला शर्ट, अशी कृती पाहून बिग बीदेखील चक्रावले!
या व्हिडिओत ब्रह्मास्त्र सिनेमातल्या कलाकारांची झलक आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट, नागार्जुन, अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यात दिसतात. तसंच ज्युनियर एनटीआरच्या सर्व सिनेमांचीही झलक पाहायला मिळते. शेवटी RRR चीही!
मेकर्स धोका पत्करत नाहीत
सध्या बाॅयकाॅट बाॅलिवूड ट्रेंड सुरू आहे. मोठमोठे सिनेमे फ्लाॅप होतायत. म्हणूनच करण जोहरनं सगळं लक्ष साउथकडे ठेवलंय. तिथे सिनेमाचं जोरात प्रमोशन सुरू आहे. त्यासाठी ज्युनियर एनटीआरचीही मदत घेतली जातेय.
रणबीर करतोय प्रमोशन
रणबीर कपूर ब्रह्मास्त्र सिनेमाचं प्रमोशन जोरदार करत आहे. याचसाठी तो चेन्नईला पोहोचला. सिनेमातले त्याचे सहकलाकार एसएस राजामौली आणि नागार्जुन त्याच्या बरोबर होते. हा सिनेमा दाक्षिणात्य भाषांमध्येही रिलीज होतोय. सिनेमाचे इव्हेंट्स सोशल मीडियावर शेअर होत आहेत.
कियारा- कार्तिक आर्यन या मराठी दिग्दर्शकासाठी करणार काम
या व्हिडिओत रणबीर एसएस राजामौली आणि नागार्जुन यांच्या पाया पडतोय. हे पाहून चाहते खूश झालेत. एका बाजूला ब्रह्मास्त्र सिनेमावर बाॅयकाॅट करा सुरू आहे, तर दुसरीकडे रणबीरनं आलियावर केलेल्या कमेंटबद्दल त्याच्यावर टीका सुरू आहे. अर्थात, याबद्दल रणबीरनं माफीही मागितली आहे. पण आताचा हा व्हिडिओ मात्र व्हायरल झालाय. अनेक जण म्हणतायत की रणबीर एक विनम्र व्यक्ती आहे. अभिनेत्याचं कौतुक सुरू आहे.
ब्रम्हास्त्रच्या प्रमोशन दरम्यान आलियानं केलं बेबी बंप फ्लॉन्ट
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या