कान्स मधील लुक

ऐश्वर्या राय बच्चन गेले 18 वर्षे न चुकता कान्स चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेट वर दिसून येते. तिच्या एन्ट्री वेळी या 18 वर्षांत काहीच बदललेले नाही. आजही तिची एन्ट्री झाली की सगळे आ वासून तिच्याकडे पाहत असतात. सगळ्या नजरा मग स्त्री असो की पुरुष तिच्याकडे जणू सरसावतात. पण प्रत्येक वर्षी एक गोष्ट वेगळी दिसून येते ती म्हणजे ऐश्वर्याची फॅशन! तिने अनेकदा कान्स मध्ये बोल्ड अवतार सुद्धा दाखवले आहेत. यातून ती कोणत्याही लुक्ससाठी बनली आहे हे मात्र प्रकर्षाने सिद्ध झाले.
(वाचा :- गुटखा किंगच्या मुलीचा भव्यदिव्य शाही विवाहसोहळा, गुलाबी लेहंग्यातील या स्टाइलिश-हॉट नवरीला बघून चाहते मंत्रमुग्ध..!)
2005 चा लुक

ऐश्वर्याचा सर्वात जबरदस्त अंदाज दिसून आला होता 2005 सालच्या कान्स रेड कार्पेट वर! या वेळी ऐश्वर्या नाजूक लेसने तयार केलेला गाऊन परिधान करून अवतरली होती आणि या वेळेस तिच्या अदांनी कित्येक हृदये घायाळ झाली असतील याची गणतीच नाही. आपल्या एका एन्ट्रीने तिने हॉलीवूडच्या भल्या भल्या अभिनेत्रींची लाईमलाईट सुद्धा हिरावली. माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चनने 2002 मध्ये कान्स येथे पदार्पण केले होते. जिथे तिने हॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रींनाही टक्कर दिली होती, खास करून अशा अभिनेत्रींना ज्यांना रेड कार्पेटवर अनेकदा त्यांच्या सौंदर्यासाठी ओळखले जायचे. फेमस डिजाईनर नीता लुल्लाच्या गुलाबी बस्टीयर लेहंगामध्ये ती खरंच विश्वसुंदरी भासत होती.
(वाचा :- ‘पुष्पा’ची खरी श्रीवल्ली म्हणजेच खरी बायको पाहिली का? अल्लू अर्जूनच्या हॉट-बोल्ड बायकोला बघितल्यावर विसरून जाल इतर मादक अभिनेत्रींना!)
कटआउट डिटेलची जादू

रेड कार्पेट वर आपल्या स्टायलिश अपीयरेंस साठी ऐश्वर्या रायने स्वत:ला ब्लॅक कलर मध्ये स्टाईल केले होते जे तिच्या स्कीन टोनला एकदम मस्तपैकी एक्झीबीट करत होते. हे आउटफिट ऐश्वर्याने इटालियन हाय अँड लक्झरी फॅशन हाउस Gucci च्या कस्टममेड कलेक्शन मधून निवडले होते. ज्यात बोल्डनेस भरभरून होता. हा ड्रेस स्ट्रेचेबल मटेरियल पासून बनवला होता. ज्याची फिटिंग फिगर-हगिंग होती. तर आउटफिट मध्ये डीप प्लंजिंग नेकलाइन दिसत होती. ज्यात टीजिंग इफेक्ट क्रियेट करण्याचे काम बस्ट एरियावर बनलेली कटआऊट डिजाईन करत होती.
(वाचा :- 54 वर्षांच्या माधुरी दीक्षितने घातला पातळ पट्टीचा अत्यंत बोल्ड ड्रेस, हॉटनेस बघून 16 वर्षांनी लहान अभिनेताही झाला घायाळ..!)
स्लिम ट्रिम बॉडी

ऐश्वर्याच्या या डार्क ब्लॅक ड्रेसमध्ये अनेक असे एलीमेंट्स होते, जे तिला बोल्ड लुक देत होते. पण आउटफिटच्या कंबरेच्या भागामध्ये क्रियेट केला गेलेला कोर्सेट स्टाइल पॅटर्न पूर्ण लुकच्या स्टाईल कोशंटला जबरदस्त ग्लॅमर देत होता. ड्रेसवरील कंबरेच्या भागाला हलक्या व ट्रान्सपरंट कपड्यात डिजाईन केले गेले होते. ज्यात केवळ ऐश्वर्याची स्लिम ट्रिम बॉडीच स्मार्टली दिसत नव्हती तर केवळ या एका डिटेलमुळे तिच्या लुकची ऑनलाईन जगतात सुद्धा खूप चर्चा झाली. तर ड्रेसच्या अप्पर पार्ट मध्ये बस्टीयर लुक ठेवला होता, जो कॅरी करण्यासाठी ऐश्वर्याने ब्रा स्किप केली होती. त्याचवेळी, आउटफिटच्या मागील बाजूस U आकाराचे डिझाइन देखील जोडले गेले होते, जे तिची सेक्सी कंबर हायलाइट करत होते.
(वाचा :- मांडीपर्यंत मधून कट असलेला ड्रेस घालून पाय-यांवरून सांभाळून उतरताना दिसली करीना कपूर, स्लिट ड्रेसमध्ये दाखवला पुन्हा एकदा हॉटनेसचा जलवा..!)
चोपार्ड ज्वेलरीने लुक केला कंप्लिट

ही गोष्ट तर कोणीच नाकारणार नाही की ऐश्वर्या रायचे हे आउटफिट तिच्या कान्स लिस्ट मधील सर्वात बोल्ड आउटफिट आहे. अनेकांना तिचा हा लुक आवडला नाही हे देखील खरे! पण फॅशन स्टाईलच्या दृष्टीने तिच्या चाहत्यांनी तिचा हा लुक डोक्यावर उचलून घेतला. ऐश्वर्याला सुद्धा यात काही वावगं वाटलं नाही आणि लोकं काय म्हणतात याचा ती कधी विचार सुद्धा करत नाही. तिने हा ड्रेस स्टाईल करण्यासाठी लक्झरी लेबल चोपर्ड मधून डायमंड इयररिंग्स पिक केले होते ज्यासोबत तिने हातात मॅॅचिंग ब्रेसलेट सुद्धा परिधान केले होते. तर मेकअप तिने न्यूड आणि ग्लॉसी ठेवला होता व आपले केस मोकळे ठेवून हा लुक कंप्लिट केला होता.
(वाचा :- ब्रालेट ब्लाउज, पातळ कपड्याची साडी आणि वर लाल अक्षरात लिहिलेला ‘हा’ एक शब्द, अभिनेत्रीच्या मादक लुकवर घायाळ चाहत्यांनी म्हटलं..!)