Anil Kapoor च्या फॉरेन व्हर्जनचा सोशल मीडियावर धुमाकूळ; तुम्ही पाहिलात का?

मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूडमधील मोठमोठ्या कलाकारांचे डुप्लिकेट आपल्याला नेहमीच पहायला मिळतात. कलाकारांचे डुप्लिकेट इंटरनेटवर नेहमीच चर्चेचा विषय ठरलेले आहेत. अशातच डुप्लिकेट कलाकारांच्या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली आहे. हे नाव दुसरं तिसरं कोणतं नसून बॉलिवूडचे फॉरेव्हर यंग म्हणून ओळखले जाणारे अनिल कपूर आहेत. अनिल कपूरच्या डुप्लिकेटने सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. अनिल कपूर सारख्या दिसणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला पाहून अनिलचे चाहते थक्क झाले आहेत.

अनिल कपूरसारखी दिसणारी दुसरी व्यक्ती अमेरिकेतील आहे. अनिल कपूरसारखा दिसणारा जॉन अफर अमेरिकेत फिटनेस प्रशिक्षक आहे. जॉन अफरने नुकताच त्याच्या इन्स्टागामवर त्याचा आणि अनिल कपूरचा कोलाज केलेला एक फोटो शेअर केला. यामध्ये एकीकडे जॉन एफर बॉडी फ्लॉंट करताना मिरर सेल्फी घेत आहे. तर दुसरीकडे अनिल कपूरचा जुना फोटो आहे. हा कोलाज शेअर होताच व्हायरल झाला आणि लोकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

जॉन अफर अनिल कपूरच्या तरुणपणीसारखा दिसत आहे. फोटो शेअर करत जॉनने लिहिलं की, मी बॉलीवूडमधील स्टार अभिनेते अनिल कपूर यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे. जॉननं त्याचा फोटोमधे अनिल कपूर यांना टॅगही केला आहे. सध्या या पोस्टवर भरभरुन कमेंट येताना दिसतायेत. ‘अमेरिकेतील अनिल कपूर, तू लवकरच बॉलिवूडमध्ये असशील, मला खरंच वाटलं अनिल कपूर आहे’, अशा प्रकारच्या अनेक कमेंट या व्हायरल पोस्टवर येत आहे.

हेही वाचा –  Rana Daggubati : सेल्फी काढणाऱ्या चाहत्यावर भडकला राणा दग्गुबती; अभिनेत्याच्या त्या कृत्याची होतेय चर्चा

दरम्यान, अनिल कपूर रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटात काम करताना दिसणार आहे. याशिवाय ते हृतिक रोशनच्या ‘फायटर’ या चित्रपटातही दिसणार आहे.

Published by:Sayali Zarad

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous नातेसंबंधात ‘प्रेमाची भाषा’ महत्वाची, गौर गोपाल दास यांनी सांगितले सुखी नात्याचे गुपित

Check Also

VIDEO पाहून तुमच्याही अंगात संचारेल; ‘मराठी पोरगी’ने अख्ख्या देशाला लावलंय वेड

मुंबई, 21 सप्टेंबर :  सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या …

हार्दिक अक्षयाच्या केळवणाला सुरूवात; लग्न उरकून लगेच बिग बॉसमध्ये एंट्री

मुंबई, 21 सप्टेंबर : तुझ्यात जीव रंगलाची हिट जोडी म्हणजे सगळ्यांच्या लाकड्या पाठक बाई आणि …