सोमवारपासून चाहत्यांना मिळणार तिकिटं
एसीएनं काल एक ट्विट करत 15 ऑगस्टपासून आशिया चषकातील सामन्यांची तिकिटं बुक करता येणार असल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर ज्या वेबसाईटवरुन ही तिकिटं काढता येणार आहेत त्याची लिंकही देण्यात आली आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान आधीच पात्र ठरले आहेत. पण सहाव्या जागेसाठी पात्रता फेरीचे सामने 20 ऑगस्टपासून होणार आहेत. या सहाव्या जागेसाठी यूएई, कुवेत, सिंगापूर आणि हाँगकाँग यांच्यात चुरस आहे.
Tickets🎟for Asia Cup 🏆2022 go up for sale on August 15th 🗓 Visit the link below from Monday onwards to book your tickets:https://t.co/BjfeZVCIxi pic.twitter.com/Q8y9mwj6Z5
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) August 13, 2022
किती असेल तिकिटाची किंमत?
आशिया चषका सामन्यांच्या तिकिटांची किंमत ही दुबई आणि शारजाहमध्ये वेगवेगळी असणार आहे. दुबईतल्या सामन्याचं कमीत कमी तिकीट 75 दिरहॅम इतकं असेल. ज्याची भारतीय रुपयातली किंमत 1625 इतकी आहे. तर हेच तिकीट शारजामध्ये मात्र 35 दिरहॅम म्हणजेच जवळपास 750 रुपयांना मिळेल.
पण भारत पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांची किंमत सर्वात जास्त आहे. उभय संघातल्या 28 ऑगस्टच्या सामन्याचं कमीत कमी तिकीट 4 हजार 300 रु. इतकं आहे. तर जास्तीत जास्त किंमत 21 हजार रुपयांपेक्षाही जास्त असेल
हेही वाचा – Sachin Tendulkar: गोष्ट सचिनच्या पहिल्यावहिल्या शतकाची, पाहा 32 वर्षांपूर्वी मॅन्चेस्टरमध्ये नेमकं काय घडलं होतं?
आशिया चषक स्पर्धेचं वेळापत्रक
ग्रुप ए :
भारत विरुद्ध पाकिस्तान : 28 ऑगस्ट, दुबई
भारत विरुद्ध क्वालिफायर : 31 ऑगस्ट, दुबई
पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर : 2 सप्टेंबर, शारजाह
ग्रुप बी
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान : 27 ऑगस्ट, दुबई
बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान : 30 ऑगस्ट, शारजाह
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश : 1 सप्टेंबर, दुबई
सुपर-4
B1 v B2: 3 सप्टेंबर, शारजाह
A1 v A2: 4 सप्टेंबर, दुबई
A1 v B1: 6 सप्टेंबर, दुबई
A2 v B2: 7 सप्टेंबर, दुबई
A1 v B2: 8 सप्टेंबर, दुबई
B1 v A2: 9 सप्टेंबर, दुबई
फायनल : 11 सप्टेंबर, दुबई
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या