स्टुअर्ट बिन्नीची फटकेबाजी
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि नमन ओझानं डावाची सुरुवात केली. पण सचिन 16 तर ओझा 21 धावा काढून बाद झाला. पण त्यानंतर सुरेश रैना आणि स्टुअर्ट बिन्नीनं भारतीय डावाला आकार दिला. या दोघांनी दक्षिण आफ्रिकन गोलंदाजी फोडून काढली. बिन्नीनं आपल्या 42 धावांच्या खेळीत तब्बल 5 चौकार आणि 6 षटकार ठोकत नाबाद 82 धावा फटकावल्या. तर सुरेश रैना 22 चेंडूत 33 धावा काढून बाद झाला. त्यानंतर आलेल्या युसूफ पठाणणही अवघ्या 15 चेंडूत नाबाद 35 धावा कुटल्या. त्यामुळे इंडिया लीजंड्सनं 4 बाद 217 धावांचा डोंगर उभारला.
🇮🇳India Legends started the tournament with a bang!💥
Stuart Binny’s 82* well supported & finished by Yusuf Pathan’s quick 35* off 15 deliveries put Indians in a strong position.
🇿🇦South African legends need to put some hard yards today!#RoadSafetyWorldSeries #RSWS #INDLvsSAL pic.twitter.com/awiTqerFMf
— Road Safety World Series (@RSWorldSeries) September 10, 2022
दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांची धुलाई
दक्षिण आफ्रिकेचा गार्नेट क्रूगर सर्वात महागडा गोलंदाज ठरला. क्रूगरनं 4 ओव्हरमध्ये तब्बल 53 धावा मोजल्या. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज मखाया एनटीनीनंही 4 ओव्हरमध्ये 52 धावा दिल्या.
Published by:Siddhesh Kanase
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या