माझी तुझी रेशीमगाठ : शेवटच्या सीनचं शूट, परीच्या डोळ्यात पाणी, म्हणाली…

मुंबई : माझी तुझी रेशीमगाठ मालिका आता संपणार, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. झी मराठीनं अनेक मालिकांना निरोप दिला. त्यात याही मालिकेचा नंबर लागला. आता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे यांच्यात जसे प्रेक्षक गुंतले होते, त्यापेक्षा जास्त छोट्या परीत गुंतले होते. त्यामुळे मालिका संपणार म्हटल्यावर प्रेक्षक परीला म्हणजेच मायराला मिस करणार.

मायरा वायकुळ ही बाल कलाकार मालिकेत येण्याआधीपासून सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत. तिचे आई-वडील तिचं इन्स्टा अकाऊंट चालवतात. याआधीही तिच्या रील्सना खूप पसंती मिळत होतीच. आताही मालिका संपणार म्हणून मायराच्या भावना इन्स्टावर शेअर केल्या आहेत.

वर्षा उसगावकर अडकल्यात वादात, सासऱ्यांनी केलं होतं प्रॉपर्टीतून बेदखल

मायरा वायकुळ म्हणते, ‘माझी तुझी रेशीमगाठी मालिकेचा ‘परी’ म्हणून हा पहिला सीन शूट केलेला दिवस अजूनही काल घडल्यासारखाच वाटतोय आणि पाहता पाहता आज मालिकेचा शेवटचा सीन शूट करण्याची वेळ आज येऊन ठेपली सुद्धा. खूप भावुक झालेय या क्षणाला. पण म्हणता म्हणता मधलं एक वर्ष कसे सरले ते कळलेच नाही; याचे कारण म्हणजे तुम्ही सर्व रसिक प्रेक्षकांनी आणि मालिकेतील सर्व कलाकारांनी व संपूर्ण टीमने ‘परी’ ला आणि अर्थातच मला म्हणजेच मायरा वायकुळला दिलेले अफाट प्रेम!’

ती पुढे लिहिते, ‘परीला तर प्रेक्षक वर्गाच्या सर्वच स्तरांतून भरभरून प्रेम मिळाले त्याबद्दल मी सर्वच रसिक प्रेक्षकांचे कायम ऋणी राहीन. आणि ‘परी’ ही गोड भूमिका मला साकारायची संधी दिल्याबद्दल MTRच्या संपूर्ण तुमचे व झी मराठी वाहिनीचे मन: पूर्वक आभार! तुम्हा सर्वांचे माझ्यावरील प्रेम- आशीर्वाद असेच कायम राहो व माझ्याकडून यापुढे छान छान कलाकृती घडत राहो अशी बाप्पाचरणी मनोमन प्रार्थना. तुमचीच लाडकी, परी अर्थात मायरा वायकुळ.’

PHOTOS: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतले नाना पाटेकरांच्या गणरायाचे दर्शन

परीच्या या पोस्टला अनेकांनी लव्ह इमोजी टाकल्यात. सगळ्यांनीच प्रेम व्यक्त केलंय. मालिका बंद झाली तरी सोशल मीडियावर मायरा सगळ्यांना भेटत राहीलच.

दुसऱ्याला बोलण्याआधी स्वतःवर मेहनत घ्या, गश्मीरचा मराठी कलाकारांना सल्ला

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

विकी कौशल माझ्या रडारवर कधीच नव्हता’; लग्नानंतर कतरिनाचा धक्कादायक खुलासा

मुंबई, 07 सप्टेंबर : कतरिना कैफ आणि विकी कौशल  हे बॉलीवूडमधील क्यूट कपल आहे. सगळीकडे …

स्पर्धकाची पत्नी म्हणाली अमिताभ बच्चनचे चित्रपट ‘फालतू’

मुंबई, 07 सप्टेंबर : कौन बनेगा करोडपती हा टेलिव्हिजनचा सर्वात प्रसिद्ध शो म्हणून ओळखला जातो. …