माझी तुझी रेशीमगाठ : सिम्मी दिसणार आता नव्या रूपात, लूक पाहून चाहते झाले थक्क

मुंबई :माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत यशवर्धन चौधरी आणि नेहाचं लग्न अगदी थाटामाटात झालं. प्रेक्षकांनी राजेशाही लग्न एंजाॅयही केलं. पण सुरू आहे नेहाची खरी परीक्षा. सिम्मी आंटीच्या मनाविरुद्ध हे लग्न झालं. तिनं कितीही मोडता घालण्याचा प्रयत्न केला तरीही ते झालं. पण आता ती यश आणि नेहामध्ये दुरावा येईल असे प्लॅन्स आखत होती. तेही नेहाच्या वहिनीला हाताशी धरून.

Photos : मराठी अभिनेत्रीचा स्विम सूट लूक पाहून नेटकरी घायाळ

नेहाच्या वहिनीनं अखेर नेहाला खरं काय ते सांगितलं. यशच्या दुसऱ्या काकीनंही नेहाला सिम्मीपासून सावध राहायला सांगितलंय. तिचे सगळे कारनामे तिनं समोर आणले. यानंतर नेहानं सिम्मीला दरडावलंच. पुन्हा असं काही केलंत तर परिणाम चांगले होणार नाहीत, असं सांगितलं. पण गप्प बसेल ती सिम्मी कुठली? तिनं अजून एक डाव आखलाय.

सध्या सिम्मीचं काम करणाऱ्या शीतल क्षीरसागरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ती एका वेणीत, साध्या साडीत दिसतेय. यामागचं कारण काय, हे लवकरच कळणार आहे. आजोबांमुळे सिम्मीला पॅलेस सोडून साधं राहावं लागतंय की काय, हे समोर येईलच. प्रेक्षकांची मात्र उत्सुकता वाढली आहे.

ही मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. बऱ्याच अडचणी आणि गैरसमजांवर मात करत यश आणि नेहा यांनी त्यांचा संसार सुरू केला आहे. आता यश आणि नेहा यांच्यातील रोमँटिक सीनही प्रेक्षकांना सुखावत आहेत. खरं तर नेहाचा पहिला नवरा अविनाश तिच्या आयुष्यात पुन्हा आला आहे पण नेहाला याची अजून कल्पना नाही. मात्र आता या मालिकेचा एक नवा प्रोमो रिलीज झाला असून अविनाशचा चेहरा अखेर नेहाच्या समोर येणार आहे. आता अविनाश आणि सिम्मी एकत्र येऊन अजून काही घोळ घालतात का, ते कळेलंच.

संजना आणि शालिनी आल्या एकत्र, काय नक्की झालं ते या Video मध्ये पाहाच!

मेहनतीचं चीज झालं

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिले पत्र; “प्रामाणिकपणे कर्ज…”
Next फक्त एक सेटिंग बदला, स्पॅम काल्सला कायमचं ब्लॉक करा, पाहा सोपी टिप्स

Check Also

‘इश्कबाज’ फेम अभिनेत्री निशी सिंहचं निधन; मृत्यूपूर्वी पतीकडे केली होती ही मागणी

मुंबई, 18 सप्टेंबर : ‘इश्कबाज’ आणि ‘कुबूल है’ सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री निशी …

फोटोतील या गोंडस मुलीला ओळखलंत का?; आज आहे बॉलिवूडची दमदार अभिनेत्री

मुंबई, 18 सप्टेंबर : तुम्ही या गोंडस मुलीला ओळखलंत का? आज बॉलिवूडच्या चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी …