ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूचा पाकिस्तानात राडा..! ‘या’ कारणासाठी हॉटेलमधील झुंबरावर फेकली बॅट आणि हेल्मेट

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूचा पाकिस्तानात राडा..! ‘या’ कारणासाठी हॉटेलमधील झुंबरावर फेकली बॅट आणि हेल्मेट

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूचा पाकिस्तानात राडा..! ‘या’ कारणासाठी हॉटेलमधील झुंबरावर फेकली बॅट आणि हेल्मेट


ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेम्स फॉकनरने पैसे न मिळाल्यामुळे पाकिस्तान सुपर लीगला (PSL 2022) रामराम ठोकला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) कराराची रक्कम न भरल्याने त्याने हा निर्णय घेतला. फॉकनर घरी परतण्यासाठी विमानतळावर जात असताना, तो खूप रागावलेला दिसला. तो इतका संतापला की त्याने विमानतळावर जाण्यापूर्वी लॉबीच्या बाल्कनीतून बॅट आणि हेल्मेट फेकले, जे झुंबरावर जाऊन अडकले. नुकसानग्रस्त झुंबराचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत.

फॉकनरने यापूर्वी पीसीबीवर पैसे न दिल्याचा आरोप केला होता. त्याने आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये लिहिले, ”मी पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांची माफी मागतो. दुर्दैवाने मला शेवटच्या दोन सामन्यांतून माघार घ्यावी लागली. पीसीबीने माझे निश्चित मानधन न दिल्यामुळे मला हे पाऊल उचलावे लागले आहे. मी संपूर्ण कालावधीसाठी येथे राहिलो, परंतु बोर्ड माझ्याशी खोटे बोलत राहिला.”

फॉकनरने पुढच्या ट्वीटमध्ये लिहिले, ”लीग सोडताना दुःख होत आहे, कारण मला आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाकिस्तानमध्ये परत आणण्यासाठी मदत करायची होती. येथे खूप तरुण प्रतिभा आहे, परंतु मला पीसीबी आणि पीएसएलने ज्या प्रकारे वागणूक दिली गेली अपमानास्पद आहे. मला खात्री आहे की तुम्हा सर्वांना माझी भूमिका समजली आहे.”

हेही वाचा :  राजस्थानमध्ये वऱ्हाडाची बस नदीत कोसळून ९ जण ठार

हेही वाचा – “…हे समजण्यात मी अपयशी ठरलोय,” संघातून वगळल्यानंतर वृद्धिमान साहाचा संताप; गांगुली आणि द्रविडवर गंभीर आरोप

फॉकनर पीएसएल २०२२ मध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सचा भाग होता. या मोसमात त्याने सहा सामन्यांत सहा विकेट घेतल्या आहेत. पीसीबीने फॉकनरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

The post ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूचा पाकिस्तानात राडा..! ‘या’ कारणासाठी हॉटेलमधील झुंबरावर फेकली बॅट आणि हेल्मेट appeared first on Loksatta.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …