क्रिकेटला नेहमीच सज्जनांचा खेळ म्हटले जाते आणि हे खेळाडूंनी मैदानावर क्रिकेट खेळण्याच्या पद्धतींनी अनेकदा सिद्ध केले आहे. अनेकवेळा खेळाडूंमध्ये वाद झाले असले तरी खिलाडूवृत्तीचा प्रत्यय वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळाला आहे. अशीच एक घटना सर्वांसमोर आली आहे.
आयर्लंड विरुद्ध नेपाळ (IRE vs NEP) या देशांमध्ये सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील सामन्यात खिलाडूवृत्तीचे उदाहरण पाहायला मिळाले.
नेपाळचा यष्टीरक्षक आसिफ शेखने सर्वांसमोर खिलाडूवृत्तीचे उत्तम उदाहरण ठेवले आहे. खरे तर, आयर्लंडच्या डावाच्या १९व्या षटकात फलंदाज मार्क एडेअरने एक धाव चोरण्याचा प्रयत्न केला, पण दुसऱ्या टोकाला उभा असलेला अँडी मॅकब्राईन धावताना गोलंदाजाला आदळला आणि खेळपट्टीवर पडला. त्यानंतर गोलंदाजाने पटकन चेंडू उचलून यष्टीरक्षकाकडे फेकला, पण नेपाळचा यष्टीरक्षक आसिफ शेखने मॅकब्राईनने धावबाद केले नाही. कारण अशा प्रकारे आऊट होणे हे खेळाच्या भावनेच्या विरोधात असेल, असे शेखला वाटले.
हेही वाचा – IPL 2022 : शिक्कामोर्तब..! मुंबईच्या खेळाडूची KKRच्या कॅप्टनपदी निवड
आसिफ शेखच्या या कृतीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या मेरीलेबोन क्रिकेट क्लबनेही त्याचा हा व्हिडिओ शेअर करताना एक मोठी गोष्ट सांगितली. एमसीसीने या संदर्भात लिहिले की, असिफ शेख आणि नेपाळने क्रिकेटचा महान आत्मा दाखवला आहे. नेपाळने हा सामना आयर्लंडकडून ११ धावांनी गमावला असला, तरी आसिफ शेखने सर्वांची मने जिंकली.
The post VIDEO : रनआऊटची संधी सोडली, तरीही विकेटकीपरचं होतंय तुफान कौतुक; वाचा कारण! appeared first on Loksatta.