Sajana : चित्रकार शशिकांत धोत्रेंचा ‘सजना’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Sajana : चित्रकार शशिकांत धोत्रे (Shashikant Dhotre) एक चित्रकार म्हणून लोकप्रिय आहेतच. पण आता ते दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. त्यांचा आगामी ‘सजना’ (Sajana) सिनेमा 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे नुकतेच एक पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सिनेमाचे पोस्टर शशिकांत धोत्रेंनीच स्केच केले आहे. 

‘सजना’ सिनेमाचे दिग्दर्शक शशिकांत धोत्रे म्हणाले, ‘सजना’ या सिनेमात नवोदित कलाकार असणार आहेत. लवकरच या सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार आहेत. हा सिनेमा रोमॅंटिक असणार आहे. सिनेमाचे कथानक हे सत्यघटनेवर आधारित असण्यासोबत काल्पनिकदेखील आहे. मला आधीपासूनच दिग्दर्शक व्हायचे होते. पण अपघाताने चित्रकार झालो आहे. त्यामुळे या सिनेमासाठी मी खूप उत्सुक आहे”.
शशिकांत धोत्रेंनी सोशल मीडियावर सिनेमाचे पोस्टर शेअर करत लिहिले आहे, “चित्रकार म्हणून तुम्ही मला ओळखत असाल. मला स्पष्ट आठवत ही नाही तेव्हापासून मी चित्र काढत आलो आहे. प्रोफेशनल चित्रकार व्हायच्या आधी जेव्हा मी कशात करियर करणार आहे हे मला ही ठाऊक नव्हतं, पण तेंव्हापासुन आजतागायत एक स्वप्न मात्र मी उराशी बाळगून होतो. ते स्वप्न मी लवकरच तुमच्या समोर घेऊन येतोय. त्या स्वप्नामध्ये रंग भरायच्या आधी मी त्याचं एक स्केच केल आहे. माझ्या चित्रपटाचं पहिलं पोष्टर मी आज तुमच्यासमोर घेऊन येत आहे याचा मला खूप आनंद आहे”.

हेही वाचा :  'ऑस्कर'साठी नामांकित झालेल्या भारतीय सिनेमांची यादी जाणून घ्या...

संबंधित बातम्या

MIFF : 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला 29 मे पासून होणार सुरुवात

Gangubai Kathiawadi Controversy : ‘गंगूबाई काठियावाडी’वरून नवा वाद, मुलगा म्हणाला ‘माझी आई समाजसेविका होती, पण चित्रपटात….’

Amol Kolhe : डॉ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …