Breaking News
  • आजपासून नवा बदल! जन्माचा दाखला आजपासून देशभरात महत्त्वाचा पुरावा
  • Amazon Great Indian Festival 2023 सेल या दिवसापासून होणार सुरू, यावर भरघोस ऑफर्स
  • Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस मुसळधार पाऊस, असा असेल परतीचा पाऊस
  • “शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरलीच नाहीत, मग…”, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत!
  • आता फक्त 101 दिवसांची प्रतिक्षा; इस्रोच्या आदित्य एल-1 सूर्यमोहिमेबाबत मोठी अपडेट

VIDEO : विराटच्या सांगण्यावरून रोहितनं घेतला DRS; पंचांनी दिला होता WIDE!

या घटनेवरून रोहित विराटवर किती विश्वास ठेवतो हे पुन्हा एकदा दिसून आलं.

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात कॅरेबियन संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ गडी गमावून १५७ धावा केल्या. भारताचा कप्तान रोहित शर्माने पुन्हा एकदा उत्कृष्ट नेतृत्व केले आणि गोलंदाजांचा चांगला उपयोग करून घेतला. या सामन्यात पुन्हा एकदा माजी कर्णधार विराट कोहली रोहितला डीआरएस घेण्यात मदत करताना दिसला.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये रोहित शर्मा डीआरएस घेण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे दिसून येते, परंतु जेव्हा विराटने त्याला राजी केले, तेव्हा त्याने विचार न करता रिव्ह्यू घेण्याचे ठरवले. ही घटना ८व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर घडली. फिरकीपटू रवी बिश्नोईचा चेंडू रोस्टन चेसच्या पॅड आणि बॅटच्या जवळ जाऊन ऋषभ पंतच्या ग्लोव्हजमध्ये गेला. सर्व खेळाडूांनी पंचांकडे अपील केले, पण पंचांनी या चेंडूला वाइड ठरवले. त्यानंतर विराटने रोहितला हा डीआरएस घेण्यास सांगितले. तेव्हा रोहिचने रिव्ह्यू घेतला.

हेही वाचा – VIDEO : असं कोण शुभेच्छा देतं? वसीम जाफरच्या बर्थडेला वॉननं केलं ट्वीट; मग पुढं काय झालं वाचा!

हेही वाचा :  “हिरोला नग्न दाखवू शकत नाही…, स्त्रीला नग्न दाखवले तर…”; स्मिता पाटील यांचं न्यूड पोस्टरवर वक्तव्य

रिप्लेवरून असे दिसून आले, की चेंडू चेसच्या बॅटला लागला नाही, त्यामुळे त्याला नाबाद दिले गेले. पण चेंडू स्टम्पला लागल्यामुळे पंचांना आपला वाइडचा निर्णय बदलावा लागला. चेसला या सामन्यात फक्त ४ धावा करता आल्या. मात्र, या घटनेवरून रोहित विराटवर किती विश्वास ठेवतो आणि त्याचे ऐकतो हे पुन्हा एकदा दिसून आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …