IND vs WI, 1st T20: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात भारताने सहा विकेट्सनी सामना जिंकत मालिकेतही 1-0 ची आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली, ज्यानंतर विंडीजला 157 धावांत रोखत समोर असलेलं 158 धावाचं लक्ष भारताने 18.5 षटकात पूर्ण करत सामना सहा विकेट्सनी जिंकला.

विंडीजचे सुरुवातीचे विकेट पटापट गेले पण निकोलस पूरनने एकहाती खिंड लढवत अप्रतिम अर्धशतक ठोकत 61 धावा केल्या. ज्यामुळे विडींजची धावसंख्या दीडशे पार पोहोचली आहे. ज्यामुळे भारतासमोर आता 158 धावांचे लक्ष होतं. जे भारताने ईशान आणि रोहित यांच्या धडाकेबाज सलामीसह, व्यंकटेश अय्यर आणि सूर्यकुमारच्या नाबाद खेळीच्या जोरावर पूर्ण केले.

[tw]https://twitter.com/BCCI/status/1494001200819490817[/tw]

असा पार पडला सामना

सामन्यात भारताने नाणेफेक जिंकल्यानंतरही प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेस्ट इंडीजला कमी धावांमध्ये बाद करुन नंतर लवकरात लवकर लक्षापर्यंत पोहोचत सामना जिंकण्याची भारताची रणनीती होती. त्यानुसार पहिल्या षटकात भारताने विकेट घेत उत्तम सुरुवात केली. विडींजचे बहुतेक फलंदाज भारतीय गोलंदाजांच्या जाळ्यात अडकले. पण निकोलस पूरनने एकहाती झुंज देत 43 चेंडूत 61 धावा ठोकल्या. मेयर्स आणि कर्णधार पोलार्ड यांनीही अनुक्रमे 31 आणि 24 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. ज्यामुळे वेस्ट इंडीजने भारतासमोर 158 धावांचे लक्ष ठेवले. भारताकडून सलामीचा सामना खेळणाऱ्या रवी बिश्नोईने सर्वोत्तम गोलंदाजी करत 4 ओव्हरमध्ये 17 धावा देत 2 महत्त्वाचे विकेट्स घेतले. त्याच्यासोबत हर्षलने 2 तर चहल, चाहर आणि भुवनेश्वर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेत विंडीजला रोखण्याचा प्रयत्न केला. अखेर 20 षटकं संपताना विडींजने 157 धावा केल्या.

ज्यानंतर भारताकडून सलामीला कर्णधार रोहित आणि ईशान आले. दोघांनी चौफेर फटकेबाजीला सुरुवात केली. रोहित 19 चेंडूक 40 धावा करुन बाद झाला. तर ईशानही 35 धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर कोहली (17) आणि पंत (8) ही स्वस्तात माघारी परतले. ज्यानंतर सूर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यर यांनी अनुक्रमे नाबाद 34 आणि नाबाद 24 धावा करत 18.5 षटकात 162 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. शेवटच्या चेंडूवर अय्यरने षटकार ठोकत सामना भारताच्या खिशात घातला.

हे ही वाचा :

IND vs SL New Schedule: भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यांच्या वेळापत्रकात बदल, बीसीसीआयची माहिती

KKR New Captain: कोलकात्याला मिळाला नवा कर्णधार, श्रेयस अय्यर सांभाळणार धुरा

IND vs WI, T20I : दुखापतीनंतर संघात परतलेला खेळाडू पुन्हा दुखापतग्रस्त, टी 20 मालिकेतून बाहेर

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

[yt]https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA[/yt]

Check Also
विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’
Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …
IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?
IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …