Bappi Lahiri: बप्पी लहरींकडे नक्की किती सोनं होतं?; मालमत्तेबद्दल स्वत:च केलेला खुलासा


प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते ६९ वर्षांचे होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. पॉप आणि रॉक म्युझिकची क्रेझ चाहत्यांच्या मनावर घर करून बसलेल्या बप्पी दाची ही बातमी ऐकून सगळ्यांचेच डोळे डोळे पाणावले आहेत. क्रिकेटर युवराज सिंग, आदित्य राज, हंसल मेहता यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांना गेल्या वर्षी त्यांनाही करोनाची लागण झाली होती.

किती आहे सोने- चांदी?

बप्पी लाहिरी यांना सोन्याची किती आवड होती हे आपल्या सर्वांना माहीत आहे. ते त्यांच्या या खास शैलीसाठी ओळखले जायचे. त्यांना अमेरिकन रॉकस्टार एल्विस प्रेस्ली आवडत होता. त्या रॉकस्टारला अनेक प्रसंगी सोन्याची साखळी आणि सोन्याचा पोशाख घातलेला त्यांनी बघितला होत. त्याची ही अनोखी स्टाइल बप्पी लहरी यांना आवडली आणि त्यांनीही आपल्या स्टाइलमध्ये सोन्याचे कपडे घालायला सुरुवात केली. बप्पी लहरी यांना भारताचा गोल्ड मॅन देखील म्हटले जाते.

बप्पी दा सोन्याचे शौकीन तर बायकोला हिऱ्याची आवड

केवळ गायक बप्पी लाहिरीच नाही तर त्यांना राजकारणाचीही खूप आवड होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्या संपत्तीचा, सोने-चांदीचा तपशील समोर आला होता. सध्या जुन्या अहवालानुसार, त्यावेळी त्यांच्याकडे ७५२ ग्रॅम सोने आणि ४.६२ किलो चांदी होती फक्त बप्पी दाच नाही तर त्यांची पत्नी चित्रांशी देखील दागिन्यांची शौकीन आहे. २०१४ मध्ये त्यांच्याकडे ९६७ ग्रॅम सोने, ८.९ किलो चांदी आणि ४ लाखांहून अधिक हिरे होते. बप्पी लाहिरी मुंबईत २००१ मध्ये खरेदी केलेल्या आलिशान घरात राहत होते. त्यांच्या घराची किंमत सुमारे ३.५ कोटी रुपये आहे. त्याच्याकडे BMW, Audi, Tesla X आणि आणखी काही लक्झरी कार आहेत.

The post Bappi Lahiri: बप्पी लहरींकडे नक्की किती सोनं होतं?; मालमत्तेबद्दल स्वत:च केलेला खुलासा appeared first on Loksatta.



Source link

हेही वाचा :  स्टायलिश दिसणारी इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये १८१ किमीची देते रेंज, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …