Bappi Lahiri Dies: निधनापूर्वीच्या बप्पीदांच्या शेवटच्या पोस्टमध्येही होता Gold चा उल्लेख; म्हणाले होते…

Bappi Lahiri Dies: निधनापूर्वीच्या बप्पीदांच्या शेवटच्या पोस्टमध्येही होता Gold चा उल्लेख; म्हणाले होते…


इन्स्टाग्रामवरील बप्पी लहरींच्या याच पोस्टवर आता अनेक चाहते त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे.

हिंदी चित्रपटांना ८० आणि ९० च्या दशकामध्ये पॉप संगीताची ओळख करुन देणारे प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं आज (१६ फेब्रुवारी २०२२ रोजी) निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६९ वर्षांचे होते. बप्पी लहरी यांच्या निधनासंदर्भात अनेकांनी सोशल मीडियावरुन शोक व्यक्त केलाय. भारतीयांना डिस्को गाण्यांची ओळख करुन देणारा आणि त्याबद्दल प्रेम निर्माण करणारा संगीतकार आपल्यातून निघून गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केलीय.

बप्पीदा नावाने लोकप्रिय असणारे बप्पी लहरी हे त्यांच्या गाण्याबरोबरच सोनं, कपडे आणि स्टाइल स्टेटमेंटसाठीही प्रसिद्ध होते. ते अनेकदा स्वत:ला असणाऱ्या सोन्यासंदर्भातील प्रेमाबद्दल सोशल मीडियावरुनही व्यक्त व्हायचे. अनेकदा ते त्यांच्या दागिण्यांचे फोटो पोस्ट करत आपल्या चाहत्यांना या प्रेमाबद्दल सांगायचे. निधनाच्या तीन दिवसांआधी पोस्ट केलेल्या त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्येही गोल्डचा उल्लेख होता. मात्र हा उल्लेख दागिण्यांसंदर्भात नव्हता. याच पोस्टवर आता चाहते त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना दिसत आहेत.

नक्की वाचा >> Bappi Lahiri Dies: बप्पी लहरी एवढं सोनं अंगावर का घालायचे?; खुलासा करताना म्हणाले होते, “माझा आवडता…”

बप्पीदांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन १३ फेब्रुवारी रोजी एक जुना फोटो पोस्ट करण्यात आलेला. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी जुनं ते सोनं असं म्हटलं होतं. याच पोस्टवर आता त्यांचे अनेक चाहते त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना कमेंट सेक्शनमध्ये दिसत आहे. सोन्याची आवड असणाऱ्या या संगीतकाराच्या शेवटच्या पोस्टमध्येही गोल्डचा उल्लेख असल्याचा विचित्र योगायोग या फोटो पोस्टच्या निमित्ताने दिसून आल्याची चर्चा चाहत्यांमध्ये आहे.

हेही वाचा :  राज्यातल्या शहरांची, गावांची नावं बदलण्यासाठी जनतेकडून मागवणार सूचना; ‘या’ मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

बप्पीदांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ साली पश्चिम बंगालमध्ये झाला. वयाच्या २१ व्या वर्षापासून ते बॉलिवूडमधील चित्रपटांना संगीत देऊ लागले. १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटाला संगीत देत त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. मात्र १९७६ साली आलेल्या ‘चलते-चलते’ या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. हा चित्रपट फारसा गाजला नाही. मात्र बप्पीदांची गाणी मात्र तुफान गाजली.

नक्की वाचा >> Bappi Lahiri: बप्पीदा आणि सचिन तेंडुलकरमध्ये होतं खास नातं; सचिनबद्दल बोलताना म्हणाले होते, “तो क्रिकेटचा…”

‘चलते-चलते’ चित्रपटानंतर बप्पीदांची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढू लागली. बप्पीदांनी ‘नमक हलाल’, ‘शराबी’, ‘हिम्मतवाला’, ‘साहेब’, ‘गुरू’, ‘घायल’, ‘रंगबाज’ या चित्रपटांनाही संगीत दिलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.



Source link