‘या’ बलिदानाला काय नाव द्यायचं? सात फेऱ्यांवर भारी पडलं प्रेम, नवऱ्याने करुन दिलं बायकोचं प्रियकराशी लग्न

Trending News : तुम्हाला ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपट आठवतोय? या चित्रपटात अजय देवगणला लग्नानंतर जेव्हा कळतं की, ऐश्वर्या राय हिचं दुसऱ्या तरुणावर प्रेम आहे. तेव्हा अजय देवगण  ऐश्वर्या राय आणि सलमान खानचं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही वेळानंतर ऐश्वर्या राय या प्रस्तावाला नकार देतो. अशीच एक घटना समोर आली आहे. (husband got wife married to her lover story of hum dil de chuke sanam up deoria viral trending news)

‘या’ बलिदानाला काय नाव द्यायचं?

उत्तर प्रदेशातही असाच काहीसा प्रकार घडल्याने आज या चित्रपटाची चर्चा होतंय. एका नवऱ्याने
आपल्या पत्नीला तिच्या प्रियकराशी भेटवून दिलं आहे. एवढंच नाही तर, त्यांचे एका मंदिरात लग्न लावून दिलं आहे. त्यानंतर या दोघांची विदाई बाइकवर करण्यात आली. 

सात फेऱ्यांवर भारी पडलं प्रेम

ही घटना उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील बरियारपूरमधील एका गावातील आहे. या गावातील एका व्यक्तीशी बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील एका मुलीचं लग्न झालं होतं. लग्नानंतर ती नवरी उदास राहत होती. फार कोणाशी बोलत नव्हती. नवऱ्याला काही कल्पना नव्हती. तिचं लग्नापूर्वी एका तरुणावर प्रेम होतं. तिच्या घरच्यांनी तिच्या मनाविरोधात तिचं लग्न लावून दिलं होतं.  

हेही वाचा :  Election 2022: निवडणूक निकालाच्या पूर्वसंध्येला राहुल गांधी काय करत होते? जाणून घ्या

नवऱ्यालाही तिच्या या प्रेम प्रकरणाची कल्पना नव्हती. लग्नाला हळूहळू एक वर्ष झालं. 22 सप्टेंबरला तिचा माजी प्रियकर आकाश शाह तिला भेटायला तिच्या गावी आला. ते दोघे घरात असताना गावकऱ्यांना संशय आला आणि त्याने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. पण महिलेचा नवरा निशब्द सगळं बघत होता. 

काही वेळाने त्याने गावकऱ्यांना त्या तरुणाला मारहाण करण्यापासून रोखले आणि त्याचा निर्णय सगळ्यांना सांगितला. सगळ्यांना वाटतं तो तरुणाला पोलिसांना देईल आणि बायकोला घरातून हाकलून देईल. पण गावकरी आणि कुटुंबाच्या कल्पनेपलिकडला निर्णय त्याने घेतला. 

कुटुंबासोबत गावकऱ्यांची समजूत काढत त्याने पत्नीचं त्याच्या प्रियकराशी लग्न लावून दिलं. गावातील एका मंदिरात त्या दोघांचं लग्न लावून दिलं. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘आरक्षण मर्यादा वाढवून आरक्षण नकोच’ ओबीसीतूनच आरक्षणावर जरांगे ठाम

Maratha Reservation : मराठा आरक्षणाला कायदेशीर मजबुती देण्यासाठी राज्य सरकारकडून क्युरेटीव्ह पीटीशन दाखल करण्यात आलीय. …

‘….इतकं समजत नसेल तर पंतप्रधान कसे होणार?,’ राहुल गांधी भेटीनंतर मुलीला म्हणाले होते प्रणव मुखर्जी, ‘यांना साधं AM, PM…’

दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तक प्रकाशित झालं असून …