UP Election: ट्विटरवरून मुख्यमंत्री योगींसह भाजपा नेत्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलीस विभागात खळबळ

भाजपा नेत्यांच्या सर्व वाहनांवर आरडीएक्स हल्ला केला जाईल, असं ट्वीटमध्ये म्हटलंय.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. लेडी डॉन नावाने बनवलेल्या ट्विटर अकाऊंटवर भाजपाच्या सर्व नेत्यांची वाहने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. सोबत हापूर पोलिसांनाही टॅग करण्यात आले आहे. याबाबत मेरठ पोलिसांनी ट्विटरला पत्र लिहून लेडी डॉन ग्रुपची माहिती मागितली आहे.

लेडी डॉनने ट्विटरवर धमकीचा मेसेज दिला होता. यामध्ये लिहिल होतं की, “ओवेसी तर फक्त मोहरा आहे. खरे लक्ष्य योगी आदित्यनाथ आहेत. भाजपा नेत्यांच्या सर्व वाहनांवर आरडीएक्स हल्ला केला जाईल. बॉम्बस्फोटात सर्वांचा जीव जाईल,” असे या ट्विटमध्ये लिहिले आहे. या ट्विटनंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

या ट्विटनंतर पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी सुरू केली. त्याचवेळी बॉम्ब निकामी पथकाने कार्यालयाची कसून तपासणी केली. एएसपी कँट सूरज राय यांचे म्हणणे आहे की, हे कृत्य काही असामाजिक तत्वांनी केले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा, लखनऊ रेल्वे स्टेशन, गोरखपूर मठ बॉम्बने उडवून देण्याची धमकीही या ट्विटमध्ये देण्यात आली आहे.

हेही वाचा :  पाचही राज्यांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर शशी थरुर पक्षाला स्पष्टच बोलले; "यश हवं असेल तर..." | Congress Shashi Tharoor on Assembly Election Result says Change is unavoidable if we need to succeed sgy 87

दरम्यान, पोलिसांच्या सतर्कतेनंतर ट्विटरने हे अकाउंट सस्पेंड केले आहे. या प्रकरणी सर्व पैलूंचा गांभीर्याने तपास करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

याशिवाय, सुलेमान भाईने गोरखपूर मंदिरात ८ ठिकाणी बॉम्ब पेरल्याचे या धमकीमध्ये म्हटले आहे. यामध्ये भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष सीमा सिंह जिंदाबाद असेही लिहिले आहे. त्यानंतर पोलिसांनी दक्षता घेत गोरखनाथ मंदिराची तपासणी केली. त्याचबरोबर पोलिसांनी मंदिराजवळील बंदोबस्त वाढवला आहे.

याप्रकरणी हापूरचे एसपी दीपक भुकर यांनी सांगितले की, लेडी डॉनच्या नावाने ट्विटर अकाउंट तयार करण्यात आले आहे. या अकाउंटवरून यापूर्वी ट्विट केले गेले होते. ज्यामध्ये इतर जिल्ह्यांना देखील टॅग केले गेले होते. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल.

Loksatta Telegram

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …