पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बप्पी लहरी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एक खास फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हिंदी चित्रपसृष्टीत आपल्या अनोख्या शैलीतल्या गाण्यांनी पाच दशकांहून अधिक काळ गाजवलेले ज्येष्ठ संगीतकार व गायक बप्पी लहरी वयाच्या ७० व्या वर्षी निधन झालं. मागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. बॉलिवूडमध्ये ‘बप्पीदा’ अशी ओळख असलेले बप्पी लहरी यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक, बॉलिवूडसह सर्वच क्षेत्रातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बप्पी लहरी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एक खास फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की, बप्पी लहरी यांचे संगीत सर्वसमावेशक, विविध भावना सुंदरपणे व्यक्त करणारे होते. पिढ्यानपिढ्या लोक त्यांच्या संगीताचे चाहते राहिले आहेत. त्यांचा जिंदादिल स्वभाव सर्वांच्या लक्षात राहणारा आहे. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांप्रती संवेदना. ओम शांती.
या ट्वीटसोबत त्यांनी एक फोटोही शेअर केला आहे.
![]()
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या
