Video : ओ चाचा..! Delhi Metro मध्ये चाचाने केला राडा, सर्वांसमोर फुकली बिडी अन्…

Smoking In Delhi Metro : एखाद्या गोष्टीचं व्यसन माणसाला कोणत्या थराला जाऊ शकतं, हे सांगू शकत नाही. दिल्ली मेट्रो (Delhi Metro) गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहे. त्याला कारण म्हणजे व्हायरल (Viral Video) होणारे व्हिडीओ. अशातच दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये एक चाचाने चालत्या मेट्रोमध्ये सर्वांना अडचणीत टाकलं. नेमकं काय झालं? प्रवाशांची भंबेरी का उडाली? पाहुया…

तर झालं असं की, एक वृद्ध व्यक्ती दिल्ली मेट्रोमध्ये चढला. त्यावेळी त्याला बसायला जागा मिळाली. त्यानंतर चाचाने थेट बिडी काढली अन् माचिसच्या सहाय्याने पेटवली. बिडी पेटत नव्हती, तरी देखील त्याने बिडी अखेर (Man Smoking Bidi In Delhi Metro) पेटवली अन् माचिसची काढी झटकत मेट्रोमध्येच फेकली. त्याचवेळी मेट्रोमधील अनेक लोक चाचाकडे बघत राहिले. माचिसची काडी पेटली राहिल्याने प्रवाशांच्या मनातील धाकधूक वाढतच होती. शेवटी एका व्यक्तीने मासिचची काढी जळत असल्याचं चाचाला सांगितलं.

पाहा VIDEO

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रवाशांनी संताप व्यक्त केला. अनेकांनी मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि दिल्ली मेट्रो अधिकार्‍यांकडून उत्तर मागितलं आहे. मात्र, डीएमआरसी (DMRC) आणि इतर अधिकार्‍यांनी अद्याप उत्तर दिलं नाही. अशा घटनेमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने अशा व्यक्तींवर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावर आता डीएमआरसी काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

हेही वाचा :  तुमचाही शशिकांत वारिसे करु... संजय राऊत यांना धमकीचा फोन

आणखी वाचा – लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना मायराला रडू कोसळलं; म्हणते, ‘देवबाप्पा रागावलास का…’

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोमधील आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, यामध्ये कपल सर्वांसमोर किसिंग (Delhi metro couple kissing video) करताना दिसत आहेत.  मेट्रोच्या दरवाज्याजवळ एक कपल एकमेकांच्या अगदी जवळ मिठीत असताना दिसून येतंय. ते फक्त एकमेकांना मिठी मारत नाही तर ते सार्वजनिक ठिकाणी किस करताना दिसून येत आहे. त्यामुळे मेट्रोमधील प्रवाशी लाजल्यात जमा झाले. हा व्हिडीओ देखील सध्या व्हायरल होत असून लोकांनी कारवाईची मागणी करण्यात आली आहे.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘आरक्षण मर्यादा वाढवून आरक्षण नकोच’ ओबीसीतूनच आरक्षणावर जरांगे ठाम

Maratha Reservation : मराठा आरक्षणाला कायदेशीर मजबुती देण्यासाठी राज्य सरकारकडून क्युरेटीव्ह पीटीशन दाखल करण्यात आलीय. …

‘….इतकं समजत नसेल तर पंतप्रधान कसे होणार?,’ राहुल गांधी भेटीनंतर मुलीला म्हणाले होते प्रणव मुखर्जी, ‘यांना साधं AM, PM…’

दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तक प्रकाशित झालं असून …