दिल्लीत डॉक्टरच रुग्णांकडून घेत होते लाच, CBI ने 9 जणांना केली अटक; RML रुग्णालयातील रॅकेटचा भांडाफोड

दिल्लीत सीबीआयने मोठी कारवाई केली असून, आरएमएल रुग्णालयात सुरु असलेल्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे. सीबीआयने रुग्णालयातील 2 डॉक्टरांसह एकूण 9 जणांना अटक केली आहे. आरोपी उपचाराच्या नावाखाली रुग्णांची लूट करत होते असा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करणारेही सहभागी आहेत. रुग्णालयात या सर्वांकडून एका प्रकारचं रॅकेटच चालवलं जात होतं. यामध्ये ते रुग्णाकडून पैसे लाटत होते. 

सीबीआयने अटक केलेल्यांमध्ये दोन डॉक्टरांचाही समावेश आहे. यामध्ये एक प्रोफेसर आणि एक असिस्टंट प्रोफेसर आहे. यांच्यावर गरीब रुग्णांकडून पैसे लाटल्याचा आणि वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा कऱण्याच्या नावाखाली डिलर्सकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. सीबीआयने डॉक्टर आणि वैद्यकीय उपकरणांशी संबंधित डीलर्सच्या 15 ठिकाणांवर धाडी टाकल्या आहेत. सीबीआयने एफआयआरमध्ये एकूण 16 आरोपींचा उल्लेख केला आहे. 

आरएमएल रुग्णालयातील असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर पर्वतगौडा यांना जवळपास अडीच लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. ही लाच त्यांना युपीआयच्या माध्यमातून मिळाली होती. याशिवाय रुग्णलायातील कॅथ लॅबचा सीनिअर टेक्निकल इंचार्ज रजनीश कुमार यालाही अटक करण्यात आली आहे. 

सीबीआयने कार्डिओलॉजी विभागातील प्राध्यापक डॉ. अजय राज, नर्स शालू शर्मा, रुग्णालयातील लिपिक भुवल जैस्वाल आणि संजय कुमार गुप्ता यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. त्यापैकी चारजण वेगवेगळ्या उपकरणांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांमध्ये काम करतात. या सर्वांना सीबीआयने भ्रष्टाचार प्रतिबंधक आणि गुन्हेगारी कट 120बी अंतर्गत अटक केली आहे.

हेही वाचा :  Bill Payment: विना इंटरनेटही करू शकता UPI द्वारे बिल पेमेंट, जाणून घ्या कसं ते

मिळालेल्या माहितीनुसार, हे आरोपी पाच मॉड्यूलच्या माध्यमातून भ्रष्टाचार करत होते. रुग्णांवर उपचाराच्या नावाने ते पैसे लाटत होते. स्टेंट आणि इतर वैद्यकीय गरजांचा पुरवठा, विशेष ब्रँडच्या स्टेंटचा पुरवठा, लॅबमध्ये वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा, लाचेच्या बदल्यात रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेणे, बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे देण्याच्या नावाखाली रुग्णांकडून खंडणी वसूल केली जात होती.

सीबीआयला राम मनोहर लोहिया रुग्णालयातील अनेक डॉक्टर आणि कर्मचारी भ्रष्टाचारात सहभागी असून वेगवेगळ्या मॉड्यूलच्या आधारे भ्रष्टाचार करत असल्याची माहिती मिळाली होती. जसं की वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा, डॉक्टर्सकडून त्यांचं प्रमोशन, याच्या बदल्यात कंपन्यांकडून मोठी रक्कम, गरिबांवर उपचार करण्याच्या नावाखाली क्लर्ककडून पैशांची वसुली अशा अनेक गोष्टी केल्या जात होत्या. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा; महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान

Lokshabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यासाठी  आज (20 मे) मतदान होत …

Ebrahim Raisi : इराणच्‍या राष्ट्राध्यक्षाच्‍या हेलिकॉप्टरचा अपघात; पीएम मोदी चिंतेत, म्हणाले…

PM Modi On Iran helicopter crash : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी (Ebrahim Raisi) आणि परराष्ट्र …