डायबिटीससाठी मेथी दाणे ठरतात वरदान, सुरक्षित पद्धत घ्या जाणून

Fenugreek In Diabetes: मेथीचे दाणे अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जातात. तर काही जण वजन कमी करण्यासाठीही मेथीच्या दाण्यांचा उपयोग करतात. तर अनेक ठिकाणी मेथी रक्तातील साखरेची पातळी कमी करतात असेही सांगण्यात येते. पण डायबिटीसच्या रूग्णांसाठी खरंच मेथीच्या दाण्याचे सेवन करणे सुरक्षित आहे का?

WHO च्या म्हणण्याप्रमाणे २०३० पर्यंत मधुमेह हा आजार अधिक व्यक्तींना होऊ शकतो. भारतामध्ये सर्वात जास्त मधुमेहाचे रूग्ण आढळतात. तरूण व्यक्तींमध्येही ताणामुळे मधुमेहाचे प्रमाण वाढतेय. टाईप १, टाईप २, गर्भावस्थेतील मधुमेह आणि प्रीडायबिटीस असे वेगवेगळे प्रकार असल्याने त्यावर उपचार करणे महत्त्वाचे आहे. आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी मेथी दाण्याचा कसा वापर करावा सांगितले आहे. (फोटो सौजन्य – iStock)

डायबिटीससाठी मेथी फायदेशीर आहे का?

डायबिटीससाठी मेथी फायदेशीर आहे का?

मेथीचे आरोग्यासाठी फायदे होतात. पण डायबिटीस रूग्णांसाठी आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मधुमेहात साखरेची पातळी वाढतेच असं नाही तर अचानक साखर कमीही होते, जे आरोग्यासाठी धोकादायक ठरते. त्यामुळे साखरेची पातळी कमी करणारी मेथी खाऊ शकतात की नाही असा प्रश्न येतो. डॉक्टर्सच्या म्हणण्याप्रमाणे मधुमेहासाठी मेथी खाणे सुरक्षित आहे. मेथीमधील फायबर, कार्बोहायड्रेट रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रित करण्यास मदत करते.

हेही वाचा :  डायबिटिसमुळे रक्ताचं रुपातंर पाण्यात होतं, उपवासाच्या दिवशी चुकूनही करू नका या गोष्टी

मेथीच्या दाण्याचा मधुमेहात कसा होतो उपयोग?

मेथीच्या दाण्याचा मधुमेहात कसा होतो उपयोग?

वास्तविक मेथी साखरेची पातळी कमी करत नाही तर यामधील एक योगिक आहे, जे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते आणि इन्सुलिन प्रतिरोध कमी करतात. याशिवाय मेथी मधुमेहाला थांबविण्यासाठी उपयुक्त ठरते.

(वाचा – प्रेग्नन्सीशिवाय स्तनांमधून दूध येणे खरंच धोकादायक आहे का? कोणत्या आजाराची धोक्याची घंटा, घ्या जाणून)

मेथी दाण्यांचे प्रमाण किती असावे

मेथी दाण्यांचे प्रमाण किती असावे

डॉ. भागवत यांच्या म्हणण्याप्रमाणे, मधुमेह व्यक्तींनी वजन, वय आणि आरोग्य पाहून मेथी दाण्याचे सेवन करावे. मात्र डॉक्टरांकडून मेथीचे सेवन कमी प्रमाणात करण्याचा सल्ला सहसा दिला जातो. साधारण एक ग्लास पाण्यात रात्रभर १-२ टी-स्पून चमचे मेथी दाणे भिजवून ठेवावे आणि मग सकाळी ते पाणी प्यावे अथवा जेवणात मेथीची ताजी पाने मिसळावी असे सांगण्यात येते.

(वाचा – How To Lose Weight: ३०० किलो वजनाच्या माणसाने केले १६५ किलो वजन कमी, आजीच्या एका शब्दासाठी घेतली मेहनत)

पाण्यात भिजवून खावे मेथी दाणे

पाण्यात भिजवून खावे मेथी दाणे

​मेथी दाण्याचे सेवन करणे सर्वात सोपे आणि सहज पद्धतीचे आहे. तुम्ही रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे. सकाळी उठल्यानंतर हे पाणी असंच अथवा उकळून प्यावे. सकाळी उपाशी पोटी मेथी दाण्याचे पाणी प्यायलाने तुम्हाला डायबिटीस नियंत्रणात आणणे सोपे जाते.

हेही वाचा :  मधुमेहींसाठी करण्यात येण्यारी मेटाबॉलिक शस्त्रक्रिया नक्की काय असते, तज्ज्ञांकडून माहिती

(वाचा – आलियाने जेवण न सोडता केले ६ महिन्यात २० किलो वजन कमी, ऋजुता दिवेकरचे डाएट)

मेथी दाण्यांना आणा मोड

मेथी दाण्यांना आणा मोड

तुम्हाला हवं असेल तर मेथी दाण्यांना मोडदेखील आणू शकता. चणे, मूग, मटकीप्रमाणेच तुम्ही मेथी दाण्यांना मोड आणून त्याचा उपयोग करू शकता. पराठे, भाजी, हेल्दी सँडविच यामध्ये या मोड आलेल्या मेथीचा तुम्ही उपयोग करू शकता. याची चव कडू असली तरी अन्य साहित्यासह तितका कडवटपणा लागत नाही. डायबिटीस कमी होण्यास मदत मिळते.

डायबिटीससाठी वापरा मेथी पावडर

डायबिटीससाठी वापरा मेथी पावडर

मेथी दाणे आणि कारल्याच्या बिया मिक्स करून तुम्ही पावडर तयार करून ठेवा आणि सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यात मिक्स करून हे पाणी प्या. यामुळे डायबिटीस नियंत्रणात येते. मात्र याचे प्रमाण आपल्या डॉक्टरांना विचारून घ्या.

जास्त मेथी दाणे खाणं ठरू शकतं घातक

जास्त मेथी दाणे खाणं ठरू शकतं घातक

डॉक्टरांच्या मते मेथीच्या दाण्याचा जितका फायदा आहे तितके नुकसानही आहे. जंत, सूज आणि पोट खराब होऊ शकते. याशिवाय जास्त सेवन केल्यास, पचनसंबंधी त्रास होऊ शकतो. त्यामुळे प्रमाणातच याचा वापर करावा.
टीप – मेथीच्या दाण्याचे डायबिटीससाठी सेवन करण्याआधी आणि आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. स्वतःच्या मनाने कोणताही उपाय करू नका.

हेही वाचा :  Surya Grahan 2024 : वर्षातील पहिलं सूर्यग्रहण कधी? भारतात दिसणार का? जाणून घ्या तारीख, सूतक काळ

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : तीन तिघाडा, काम बिघाडा..! अजितदादांमुळे महायुतीला फटका? पाहा स्पेशल रिपोर्ट

Special Report On Mahayuti Politics : लोकसभेच्या निकालात महायुतीचा राज्यात धुव्वा उडाला. आता महायुतीत यावरुन …

पुण्याच्या रस्त्यावर बाईकस्वाराला चिरडणारी मर्सिडीज बेंज कोणाच्या मालकीची? माहिती आली समोर

Pune Accident: पुण्याच्या रस्त्यांवर धावणाऱ्या महागड्या गाड्यांखाली चिरडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. त्यामुळे पुण्याच्या रस्त्यांवर …