Maharashtra Rain Updates : कोकण- विदर्भात यलो अलर्ट; तुमच्या भागात काय परिस्थिती?

Maharashtra Rain Updates : जून महिन्याच्या अखेरीस जोर धरलेला मान्सून (Monsoon) आता राज्यात, स्थिरावताना दिसत आहे. हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार जुलै महिन्यात मान्सून नाराज करणार नसून, तो सरासरीइतकी हजेरी लावणार आहे. असं असलं तरीही राजच्यातील सध्याचं पर्जन्यमान हे कमीच असून, धरण क्षेत्रांमध्ये आणखी चांगला पाऊस होण्याची गरज हवामान विभागानं व्यक्त केली आहे. 

सध्या अलिबाग (Alibag), ठाणे (thane), पालघर या भागांमध्ये पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. तळकोकणाही परिस्थिती वेगळी नाही. पावसानं जोर धरल्यामुळं बहुतांश भागांमध्ये शेतीच्या कामांना वेग आला असून, भात लावणीची कामं अनेकांनीत हाती घेतली आहेत. पुढील काही दिवसांच्या हवामानाविषयी सांगावं तर, 13- 14 जुलै रोजी राज्यात पावसाचं प्रमाण समाधानकारक असेल. तर, काही भागांमध्ये तो अतीमुसळधार कोसळेल. 

पुणे वेधशाळेचे महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार, ‘महाराष्ट्रात पुढील 4, 5 दिवस पाऊस संमिश्र राहील, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तरस मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे’. पावसाच्या या स्थितीमध्ये 13 जुलैनंतर सुधारणा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

कुठे दिलाय अलर्ट? 

पावसाच्या धर्तीवर सध्या कोकण आणि विदर्भ पट्ट्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईत पावसाळी सरींची ये-जा सुरु राहणार असून, ढगांची उघडीप पाहायला मिळेल. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये समुद्र खवळलेला असेल. किनारपट्टी भागात सोसाट्याचा वाराही वाहील. त्यामुळं पावसाचा आनंद घेण्यासाठी समुद्रकिनारी जाणार असाल तर, काळजी घ्या. 

हेही वाचा :  चंद्रपूर : वन्यप्राण्याने १६ वर्षीय मुलाला उचलून नेल्याने वन खात्यात खळबळ

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या देवी जागरणचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …