लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी ‘कपल गोल्स’ केले सेट, कतरीना कैफ आणि विकी कौशल झाले भावनिक

आज कतरिना आणि विकी कौशल लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या निमित्ताने या दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनवरुन त्या दोघांचे एकमेकांवर किती प्रेम आहे हे दिसून येते. सोशल मीडियावर विकी आणि कतरिनाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये विकीसाठी कतरिना किती खास आहे हे सांगत असतो. तर कतरिना तिच्या प्रत्येक गोष्टीत गोंधळ घालण्याच्या सवयीवर विकी तिची कशी मदत करतो हे सांगिताना दिसते. अनेक कठीण काळात ते एकमेकांच्या सोबत पाहायला मिळाले आहेत. त्याच्या या लव्हस्टोरी वरुन आपणही अनेक गोष्टी शिकू शकतो. (फोटो सौजन्य : @katrinakaif, @vickykaushal09 )

​लग्नाच्या वाढदिवसानिमित्त विकी-कतरिनाचे फोटो

कतरिना कैफ आणि विकी कौशल 9 डिसेंबरला त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत. या दोघांनी त्यांच्या लग्नातील न पाहिलेले फोटो शेअर केले आणि आम्हा सर्वांना सुखद धक्का दिला. या फोटोला तिने “माझ्या आयुष्यातील प्रकाशाच्या किरणांना एक वर्ष पूर्ण झालं”

हेही वाचा :  Tiger 3 : शाहरुख खान आणि सलमान खान जूनमध्ये करणार 'टायगर 3'च्या शूटिंगला सुरुवात

​प्रेमाचे वचन

काही रोमँटिक फोटो शेअर करत विकीने लिहिले की, ‘वेळ किती पटकन जात आहे… पण माझ्या प्रिये तुझ्यासोबत सर्वात जादुई पद्धतीने जात आहे. लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन. मी तुझ्यावर कल्पनेपेक्षा जास्त प्रेम करतो!’

विकीची पोस्ट

​विकी-कतरिना वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आहेत

कतरिना कैफ आणि विकी कौशल 9 डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहेत. त्याआधी, हे जोडपे त्यांचा खास दिवस एकत्र साजरा करण्यासाठी एका हिल स्टेशनला रवाना झाले आहेत. कतरिनाने इंस्टाग्रामवर फुलांचा स्वेटर घातलेले स्वतःचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत, जे तिने डेनिम्ससह स्वेटशर्ट परिधान केले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिचे ‘पहाडांमध्ये फोटो क्रेडिट : पती असे लिहिले आहे.

एकांत क्षण

​कतरिनाच्या लग्नाची पोस्ट

9 डिसेंबर 2021 च्या रात्री, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले. या फोटोसोबत कतरिनाने, ‘आमच्या हृदयात फक्त प्रेम आणि कृतज्ञता आहे ज्याने आम्हाला या क्षणापर्यंत आणले आहे. आम्ही एकत्र या नवीन प्रवासाची सुरुवात करत असताना आम्ही तुम्हा सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद लाभावेत असे कॅप्शन दिले आहे.

हेही वाचा :  Shraddha Kapoor : इन्स्टाग्रामवर श्रद्धाचे 75 मिलियन फॉलोअर्स!

कतरिनाचे प्रेम

​एकमेकांच्या सोबत राहा

तुमच्या आयुष्यात किती ही संकटे आली तर तुमच्या जोडीदाराची साथ कधीही सोडू नका. यामुळे तुमचे नाते पुन्हा जोमाने फुलेल. तुमच्या नात्यात गोडवा निर्माण होईल.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …