बर्थ-डे सलमानचा पण चर्चा एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीची

Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणाऱ्या सलमान खाानचा  (Salman Khan) आज 57 वा वाढदिवस आहे. सलमान खानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पण काही सेलिब्रिटी सलमानच्या बर्थ-डे सेलिब्रेशनला हजर झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. सलमानच्या बर्थ-डे सेलिब्रेशनला शहरुख खान, अभिनेत्री संगीता बिजलानी  (Sangeeta Bijlani) यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. तसेच सलमान खानच्या कुटुंबातील काही सदस्य देखील बर्थ-डे सेलिब्रेशनमध्ये सामील झाले. 

संगीता बिजलानी आणि सलमानचे फोटो व्हायरल 
सलमान खानसोबत संगीता बिजलानी या अभिनेत्रीचं नाव जोडलं जातं. संगीता ही सलमानची एक्स गर्लफ्रेंड आहे, असंही म्हटलं जातं. सलमानच्या 57 व्या वाढदिवसाच्या पार्टीला संगीतानं ब्लु ग्लिटर ड्रेस, सिल्वर इअरिंग्स अशा लूकमध्ये हजेरी लावली. तर सलमान हा त्याच्या बर्थ-डे पार्टीला ऑल इन ब्लॅक अशा लूकमध्ये दिसला. या बर्थ-डे पार्टीमधील संगीता आणि सलमानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हायरल फोटोमधील या दोघांच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधलं. रिपोर्टनुसार, सलमान आणि संगीता हे जवळपास 10 वर्ष एकमेकांना डेट करत होते. 

हेही वाचा :  Salman Khan ची हायकोर्टात धाव, डीएन नगर पोलिसात दाखल FIR रद्द करण्यासाठी याचिका

पाहा फोटो 

2022/12/27/96c6bd0d2f8584083e5fde069dd8bec21672117519998259_original.jpeg” width=”326″ height=”404″ />

News Reels

सलमानच्या बर्थ-डे सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सलमानचा केक कट करतानाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. 


सलमानचा आगामी चित्रपट

सलमान खानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्याच्या ‘टायगर 3’ (Tiger 3) या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. आधी हा सिनेमा 23 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. हा सिनेमा येत्या वर्षात दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच आणखी दोन सिनेमांची तो लवकरच घोषणा करणार आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Salman Khan Birthday : बॉलिवूडचा दबंग स्टार झाला 57 वर्षांचा; केक कट करत सलमानने चाहत्यांचे मानले आभार

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …