Childrens Day 2022 : ‘तारे जमीन पर’, ‘मासूम’सह ‘हे’ सिनेमे ‘बालदिनी’ नक्की पाहा…

Childrens Day 2022 : आज देशभरात ‘बालदिन’ (Childrens Day 2022) साजरा केला जात आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांचं लहान मुलांवर खूप प्रेम होतं. त्यामुळेच त्यांच्या जयंतीनिमित्त भारतात दरवर्षी बालदिन जल्लोषात साजरा केला जातो. बालकांचा हक्काचा दिवस खास करण्यासाठी त्यांना ‘मासूम’ (Masoom) ते ‘तारे जमीन पर’ (Taare Zameen Par) हे सिनेमे नक्की दाखवा. त्यामुळे त्यांचं मनोरंजन होण्यासोबत प्रबोधनदेखील होईल. 

मासूम (Masoom) : 
कुठे पाहू शकता? झी 5 किंवा यूट्यूब

‘मासूम’ हा सिनेमा 1983 साली प्रदर्शित झाला होता. त्यावेळी हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. लहान मुलांच्या समस्येवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. या सिनेमात नसीरुद्दीन शाह, शबाना आजमी, सुप्रिया पाठक आणि जुगल हंसराज मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमातील ‘लकडी की काठी’ हे गाणं आजही लहान मुलं आवडीने ऐकतात. 

तारे जमीन पर (Taare Zameen Par) :
कुठे पाहू शकता? हॉटस्टार, नेटफ्लिक्स, यूट्यूब 

‘तारे जमीन पर’ हा लोकप्रिय सिनेमा 2007 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला. बालप्रेक्षकांसोबत पालकांनीदेखील पाहावा असा हा सिनेमा आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खान या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना भावूक करण्यासोबत त्यांचं प्रबोधनदेखील करेल. लहान मुलांवर शिक्षणाविषयी टाकल्या जाणाऱ्या दबावावर भाष्ट करणारा ‘तारे जमीन पर’ हा सिनेमा आहे.

हेही वाचा :  2022 मध्ये या मराठमोळ्या कलाकारांनी बांधली लग्नगाठ

आय एम कलाम (I am Kalam) :
कुठे पाहू शकता? अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ, यूट्यूब

‘आय एम कलाम’ हा सिनेमा सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. नीला माधब पांडाने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला आहे. लहान मुलांना प्रेरणा देणारा हा सिनेमा आहे. चांगलं शिक्षण घेऊन कुटुंबाचं नाव मोठं करणाऱ्या मुलाच्या आयुष्यावर आधारित हा सिनेम आहे. 

Reels

स्टॅनले का डब्बा (Stanley Ka Dabba) :
कुठे पाहू शकता? हॉटस्टार, यूट्यूब

‘स्टॅनले का डब्बा’ हा सिनेमा 2011 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अमोल गुप्तेने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबत त्यांचे डोळे उघडणारा आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना त्यांच्या शालेय जीवनातील घटनांची आठवण करून देतो. त्यामुळेच हा सिनेमा प्रत्येकाला आपलासा वाटतो. सिनेमा एकाचवेळी रडवण्यासोबत हसवण्याचंदेखील काम करतो. 

चिल्लर पार्टी (Chillar Party) : 
कुठे पाहू शकता? अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ

‘चिल्लर पार्टी’ हा सिनेमा लहान मुलांवर भाष्य करणारा आहे. या कौटुंबिक सिनेमाचं दिग्दर्शन नितेश तिवारी आणि विकास बहलने मिळून केलं आहे. या सिनेमालादेखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘चिल्लर पार्टी’ एक कौटुंबिक मनोरंजनात्मक सिनेमा आहे. वास्तवात हा चित्रपट आपल्या मनाला स्पर्श करणारा आहे. एखाद्या जनावराला वाचवण्यासाठी चिल्लर पार्टीला करावी लागणारी धडपड या सिनेमात दाखवण्यात आली आहे. 

हेही वाचा :  Adenoviruses : पालकांचे टेन्शन वाढवणारी बातमी; Adenoviruses चे थैमान, मुलांच्या आरोग्याला धोका

फ्रोझन (Frozen) :
कुठे पाहू शकता?  यूट्यूब

‘फ्रोझन’ हा लोकप्रिय सिनेमा 2013 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने लहान मुलांसह मोठ्यांनाही भूरळ घातली आहे. राजकुमारी एल्सा आणि तिची लहान बहीण अँनावर केंद्रित हा सिनेमा आहे आहे. या सिनेमाचा दुसरा भाग 2019 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा सिनेमादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. 

संबंधित बातम्या

Children’s Day 2022 : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीदिनानिमित्त साजरा करतात बालदिन; वाचा या दिनाचं महत्त्व

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …