Salman Khan Birthday : दीवाना मैं चला… सलमानला भेटण्यासाठी चाहत्याचा वेगळाच स्टंट

Salman Khan Birthday : आपल्या लाडक्या कलाकाराला पाहण्यासाठी किंवा भेटण्यासाठी चाहते कोणत्याही थराला जायला तयार असतात. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचे (Salman Khan) चाहते भारतातच नाही तर जगभरात आहेत. सध्या सोशल मीडियावर भाईजानचा एक चाहता चर्चेत आहे. समीर नामक या चाहत्याने सलमानला भेटण्यासाठी एक वेगळाच स्टंट केला आहे. समीर त्याच्या लाडक्या अभिनेत्याला भेटण्यासाठी सायकलने जबलपूरवरुन मुंबईला रवाना झाला आहे. 

सलमान खानचा 27 डिसेंबरला वाढदिवस आहे. त्यामुळे समीरला भाईजानला भेटून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. समीर गुरुवारी जबलपूरवरुन सायकलवर मुंबईला रवाना झाला आहे. प्रवास सुखकर करता यावा यासाठी त्याने सायकलला खास बॅटरी लावली आहे. 

News Reels

समीरला अवघ्या पाच दिवसांत 1100 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. आता थंडीला सुरुवात झाल्याने त्याचा हा प्रवास खूपच आव्हानात्मक आहे. पण तो भाईजानचा जबरा फॅन असल्यामुळे त्याला भेटूनच सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. त्याने चार वर्षांपूर्वी पापण्यांवर सलमान खानचे नाव लिहिले आहे. तसेच त्याने त्याच्या हातावर सलमानच्या नावाचा खास टॅटूही बनवला आहे. 

हेही वाचा :  बुर्ज खलिफावर झळकला 'पठाण' चा ट्रेलर

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खटाटोप

समीर फक्त सलमानला भेटण्यासाठी सायकलवरून 1100 किलोमीटरचा प्रवास करतो आहे. समीर 27 डिसेंबरपर्यंत भाईजानच्या वाढदिवशी त्याच्यापर्यंत पोहोचू शकेल. 
 या जिद्दी चाहत्याला सलमान भेटणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

सलमान खानच्या आगामी ‘टायगर 3’ हा सिनेमा पुढील वर्षात दिवाळीच्या मुहूर्वावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 12 नोव्हेंबरला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सलमानसह अभिनेत्री कतरिना कैफदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 

सलमानच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमात सलमान खान आणि पूजा हेगडे यांच्यासोबतच अभिनेत्री शहनाज गिलदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याचबरोबर पलक तिवारी, व्यंकटेश दग्गुबती, जगपती बाबू, राघव जुयाल हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

संबंधित बातम्या

Salman Khan : लांबलचक केस, लेदर जॅकेट अन् काळा चष्मा; ‘किसी का भाई किसी की जान’मधील भाईजानचा हटके लूक समोर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …