KVS Job 2022: केंद्रीय विद्यालयात बंपर भरती, मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

KVS Vacancy 2022: केंद्रीय विद्यालय संघटना (KVS) येथे नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. पीआरटी, टीजीटी, पीजीटीसह इतर रिक्त जागांवर तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकणार आहे. याची अर्ज प्रक्रिया ५ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण १३ हजार ४०४ पदे भरली जातील. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

पदव्युत्तर शिक्षक (PGT)च्या १,४०९, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) च्या ३१७६, प्राथमिक शिक्षक (पीआरटी) च्या ६४१४, पीआरटी (संगीत) च्या ३०३, सहाय्यक आयुक्तच्या ५२, प्राचार्यच्या २३९, उपप्राचार्यच्या २०३, ग्रंथपालच्या ३५५,
वित्त अधिकारीच्या ६, सहाय्यक अभियंता (स्थापत्य) च्या २, सहाय्यक विभाग अधिकारी (ASO) च्या १५६, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक (UDC) च्या ३२२, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (LDC)च्या ७०२, हिंदी अनुवादकच्या ११ आणि स्टेनोग्राफर ग्रेड-II च्या ५४ जागा भरल्या जाणार आहेत.

सर्व पदांसाठी अर्ज शुल्क पदानुसार वेगळे असणार आहे. उमेदवार अधिकृत अधिसूचनेत ते तपासू शकतात. एससी/एसटी/पीएच आणि माजी सैनिक श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि वर्ग डेमो/मुलाखत/कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल.

हेही वाचा :  एअर इंडिया अंतर्गत केबिन क्रू पदांची भरती

राज्यात ग्रामसेवकची पदांची बंपर भरती, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Talathi Bharti 2022: राज्यात ३११० तलाठी पदांसाठी होणार भरती, शासन निर्णय जाहीर
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

२६ डिसेंबर २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार KVS च्या अधिकृत वेबसाइट kvsangathan.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

पदभरतीचा तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
SSC CHSL 2022: स्टाफ सिलेक्शनकडून ४,५०० पदांची भरती, ८१ हजारपर्यंत मिळेल पगार

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …