SBI मध्ये परीक्षा न देता मिळेल नोकरी, ७८ हजारपर्यंत पगार

SBI Recruitment 2022: स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India, SBI) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या पदांसाठी (SBI Job 2022) अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापक (प्रोजेक्ट-डिजिटल पेमेंट, उत्पादन-डिजिटल पेमेंट/कार्ड, उत्पादन-डिजिटल प्लॅटफॉर्म) यासह अनेक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. याशिवाय, उमेदवार https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2022-23-25/apply या लिंकवर क्लिक करून थेट या पदांसाठी अर्ज करू शकतात. तुम्ही या लिंकद्वारे अधिकृत नोटिफिकेशन देखील तपासू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ५५ पदे भरली जातील.

महत्वाची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ डिसेंबर

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदांची संख्या- ५५

पात्रता निकष

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित विषयात बीकॉम/बीटेक असणे आवश्यक आहे. किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किमान ६० टक्के गुणांसह एमसीए किंवा एमबीए / पीजीडीएम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.

हेही वाचा :  सीईटीच्या निर्णयाबाबत घाई नको; शिक्षणतज्ज्ञांची अपेक्षा

TMC Recruitment: ठाणे पालिकेत नोकरीची संधी, थेट मुलाखतीतून होणार निवड

UPSC Recruitment 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगात बंपर भरती

पगार

या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना MMGS-III रु. अंतर्गत वेतनश्रेणी मिळेल. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७८,२३० रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.

निवड प्रक्रिया

या पदांसाठी निवड प्रक्रिया शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीवर आधारित असेल. बँकेने स्थापन केलेली शॉर्टलिस्टिंग समिती शॉर्टलिस्टिंग पॅरामीटर्स ठरवेल आणि त्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

हेही वाचा :  Bank Job: एक्झिम बँकेत विविध पदांची भरती, 63 हजारपर्यंत मिळेल पगार

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

NHM Recruitment: ‘या’ महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात बंपर भरती, जाणून घ्या तपशील

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांची भरती

Dehu Road Cantonment Board Invites Application From 11 Eligible Candidates For Balwadi Teacher & Balwadi …

भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीरवायु पदांची भरती

Indian Air Force Agniveervayu Recruitment 2024 – Indian Air Force Invites Application From Eligible Candidates …