How To Reduce Uric Acid : हिवाळ्यात या ५ पदार्थांपासून लांब रहा, साध्यांमध्ये साचलेले युरिक ऍसिड झटपट बाहेर पडेल

युरिक ऍसिड हे शरीरात तयार होणारा टाकाऊ पदार्थ आहे. जेव्हा शरीरात प्युरीन नावाच्या पदार्थाचे चयापचय होते तेव्हा ते तयार होते. प्युरीन हा शरीरात नैसर्गिकरित्या आढळणारा पदार्थ आहे, परंतु तो विविध पदार्थांमध्ये देखील आढळतो. यूरिक अॅसिड लघवीसोबत शरीरातून बाहेर पडतं, पण जेव्हा किडनी ते काढू टाकू शकत नाही, तेव्हा त्याची पातळी शरीरात वाढू लागते, ज्यामुळे नंतर गाउट, किडनी स्टोनसह अनेक समस्या उद्भवू शकतात.
हिवाळा ऋतू हा युरिक ऍसिडचा त्रास असलेल्या लोकांसाठी एक समस्या बनतो कारण सर्दीमध्ये वेदना, स्नायूंचा कडकपणा यांसारखी युरिक ऍसिडची लक्षणे गंभीर स्वरूप धारण करतात. यूरिक ऍसिड कमी करण्याचे कोणते मार्ग आहेत? हिवाळ्यात खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. असे अनेक खाद्यपदार्थ आहेत जे समस्या वाढवतात तर त्यातीलच काही तुम्हाला आराम देऊ शकतात. आहारातील काही पदार्थ टाळल्याने ही लक्षणे कमी होण्यास मदत होऊ शकते आणि यादरम्यान काही प्रमाणात आराम देखील मिळू शकतो. (फोटो सौजन्य : iStock)

हेही वाचा :  मटार खाल्ल्यामुळे रक्तात जमा होईल Uric Acid, आरोग्याची लागेल वाट, कमी करण्यासाठी असं खा दही

​यूरिक अॅसिड वाढण्याचे तोटे

शरीरात यूरिक अॅसिड वाढण्याचा सर्वात मोठा धोका गाउटच्या स्वरूपात प्रकट होतो. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये सांध्याभोवती यूरिक ऍसिड जमा होते. यामुळे संधिरोग सारख्या तीव्र वेदना होतात कारण यूरिक ऍसिडपासून लहान स्फटिक तयार होतात, ज्यामुळे सांध्याभोवती स्नायूंना कडकपणा येतो. हे क्रिस्टल्स कधीकधी मूत्रपिंड आणि हृदयापर्यंत पोहोचू शकतात, जे आरोग्यासाठी गंभीर असू शकतात. (वाचा – Winter Tips: रिकाम्या पोटी गुळाचे पाणी पिणे गुणकारी, बॉडी डिटॉक्ससह होतील हे ५ फायदे)

​गोड पेये

गोड पेयांमध्ये फ्रुक्टोजचे प्रमाण जास्त असते. फ्रुक्टोजचा सर्वात मोठा तोटा म्हणजे तो गाउटचा धोका वाढवतो. हिवाळ्यात सर्व साखरयुक्त पेयांपासून दूर रहा. काही फळांमध्ये हे घटक देखील असतात, जरी फळांमध्ये त्याचे प्रमाण कमी असते. (Gut Health : हेल्दी जेवणच बद्धकोष्ठता आणि अपचनाला जबाबदार, आठवणीने खा ५ प्रीबायोटिक फूड्स)

​बिअर किंवा वाईन

हिवाळ्यात ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्टीत अल्कोहोलचा विवेकपूर्वक वापर करा. NCBI वर प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, अल्कोहोलमध्ये प्युरीनचे प्रमाण जास्त असते. जर तुम्ही वारंवार अल्कोहोलचे सेवन करत असाल तर युरिक ऍसिड वाढण्याची शक्यता जास्त आहे आणि त्यासोबत त्याची लक्षणे देखील वाढतील. (वाचा – Fruits for Diabetes : ५ फळं खाऊन कंट्रोलमध्ये ठेवा डायबिटिज, इतर आजारांपासूनही होईल सुटका)

हेही वाचा :  आहारात ही हेल्दी भाजी खात असाल तर व्हा सावध, Uric Acid दुप्पट वाढून होईल त्रास वेळीच करा आहारातून बाद

​मांस आणि सीफूड

जर तुम्हाला यूरिक अॅसिडचा त्रास होत असेल आणि तो टाळायचे असेल तर तुम्ही लाल मांस, ऑर्गन मीट, सार्डिन, अँकोव्हीज, मॅकरेल यासारख्या सीफूडचा वापर कमी करा किंवा थांबवावा कारण त्यात प्युरीनचे प्रमाण जास्त असते. आठवड्यातून एकदा खाणे चांगले. (वाचा :- Omicron BF.7 बाबत चुकूनही करू नका या ५ गोष्टी, बूस्टर डोस घेऊनही जीवाला मुकाल )

​या भाज्या देखील हानिकारक आहेत

हिवाळ्याच्या हंगामात भाज्यांमध्ये भरपूर विविधता असते, परंतु जर तुम्हाला युरिक ऍसिडचा त्रास होत असेल तर तुम्ही सर्व भाज्यांचे सेवन टाळावे.एनएचआयच्या अहवालानुसार, शतावरी, पालक, फ्लॉवर, मशरूम, मटार यासारख्या भाज्यांमध्ये प्युरीन भरपूर असते आणि त्यामुळे युरिक अॅसिडची पातळी वाढू शकते. (टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारे औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. )

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …

Weather News : मुंबईत उन्हाचा लपंडाव; विदर्भ- मराठवाड्यासाठी मात्र हवामानाचा चिंता वाढवणारा अंदाज

Maharashatra Weather News : राज्यात सध्या हवामानाच्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती पाहायला मिळत आहे. तिथं …