मटार खाल्ल्यामुळे रक्तात जमा होईल Uric Acid, आरोग्याची लागेल वाट, कमी करण्यासाठी असं खा दही

युरिक अ‍ॅसिड हे एक टाकाऊ पदार्थ आहे जे शरीरातील प्युरिनच्या विघटनाने तयार होते. हा घटक अनेक खाद्यपदार्थांमध्ये असतो. जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तात यूरिक अ‍ॅसिड वाढू लागते. त्यावर नियंत्रण न राहिल्यास नंतर गाउट आणि किडनी स्टोन तयार होतात.

जेव्हा यूरिक अ‍ॅसिड वाढते तेव्हा काय होते? रक्ताची ही घाण वाढल्यामुळे शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी वेदना सुरू होतात. जर तुम्हाला सांधेदुखी, सांध्यावरील त्वचा लालसर होणे, पाठदुखी, वारंवार लघवी होणे, दुर्गंधीयुक्त लघवी इत्यादी त्रास होत असतील तर ही युरिक अ‍ॅसिडची लक्षणे असू शकतात.

​हिरवा मटार ठरू शकतो शत्रू

​हिरवा मटार ठरू शकतो शत्रू

मटारमध्ये फायबर असते आणि ही एक हिरवी भाजी आहे. पण एनसीबीआयच्या म्हणण्यानुसार त्यात प्युरीनचे प्रमाणही जास्त असते. हा असा घटक आहे, ज्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात यूरिक अॅसिड तयार होते.

​अजिबात खाऊ नका मटार?

​अजिबात खाऊ नका मटार?

जर शरीरात यूरिक ऍसिडचे प्रमाण वाढले असेल तर त्याचे सेवन मर्यादित केले पाहिजे. परंतु या परिस्थितीत, सर्वोत्तम मार्ग म्हणजे डॉक्टर आणि आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे. तुमच्या प्रकृतीचे आकलन करून कोण योग्य माहिती देऊ शकेल.

हेही वाचा :  'तुमच्या मनातले तोंडात आले आणि..' आव्हाडांचा अजित पवारांना टोला; म्हणाले, 'खरा चेहरा...'

​​(वाचा – Diet Plan For Men After 40 : चाळीशीनंतर हाडं होतात खिळखिळी, या ५ पदार्थांनी शरीर ठेवा तंदुरूस्त)​

​यूरिक ऍसिड कमी करण्यासाठी दही फायदेशीर

​यूरिक ऍसिड कमी करण्यासाठी दही फायदेशीर

जर तुम्हाला यूरिक अॅसिड नियंत्रित करायचं असेल, तर लो फॅट दही खाण्याचे फायदे घ्या. कारण, पबमेडवर प्रकाशित झालेल्या संशोधनात असे म्हटले आहे की कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ आणि यूरिक ऍसिडमुळे होणारे गाउट यांच्यात विपरित संबंध आहे. नाश्त्यामध्ये काही बेरी मिसळून कमी चरबीचे दही खाणे अधिक फायदेशीर ठरते.

​​(वाचा – जिम केल्यानंतर शरीरात दिसली ही लक्षणे, तर व्हा सावधान, ३ बदलांवर ठेवा करडी नजर)

​Vitamin C युक्त फळे नक्की खा

vitamin-c-

बेरी किंवा लिंबूवर्गीय फळे यूरिक ऍसिड काढून टाकण्यासाठी फायदेशीर आहेत. कारण त्यात व्हिटॅमिन सी असते. अनेक संशोधनात ही घाण कमी करण्यासाठी हे पोषक तत्व आढळून आले आहे.

(​वाचा – Vitamin D in India : विटामिन डी च्या अधिक सेवनाने हाडे होतील ढिसूळ, शरीरात तयार होतील दगड)

​संधिवात होईल कमी

​संधिवात होईल कमी

यूरिक ऍसिड कमी करण्याचा फायदा असा आहे की, ते गाउट म्हणजे संधिवात प्रतिबंधित करते. हा संधिवातचा सर्वात सामान्य प्रकार आहे, ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास वाढतो.

हेही वाचा :  युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात आणेल गरम पाणी, कसे प्यावे योग्य पद्धत घ्या जाणून

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …