Flipkart ची स्पेशल ऑफर! आयफोन13 वर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काऊंट

मुंबई : Apple ने गेल्या वर्षी आयफोन 13 सीरीज लाँच केली होती. लॉन्च होताच लोकांमध्ये त्याला जबरदस्त पसंती मिळाली. फोनची विक्रमी विक्री झाली. iPhone 13 79,900 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. मात्र ई-कॉमर्स प्लटफॉर्मवर त्याची किंमत कमी झाल्याचे दिसून येत आहे. iPhone 13 128GB स्टोरेज व्हेरिएंट Flipkart आणि Amazon वर 74,900 रुपयांना उपलब्ध आहे. पण Flipkart वर iPhone 13 वर जास्त डिस्काऊंट मिळत आहे.

जर तुम्ही iPhone 13 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य संधी असू शकते. बँक आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊन, आयफोन 13 अतिशय स्वस्त किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो.

iPhone 13 ऑफर आणि सवलत

iPhone 13 128GB स्टोरेज वेरिएंटची लॉन्चिंग किंमत 79,900 रुपये आहे, परंतु हा फोन फ्लिपकार्टवर 74,900 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच फोनवर 5 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. त्यासोबतच एक बँक आणि एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. ज्यामुळे फोनची किंमत लक्षणीयरीत्या कमी होते.

हेही वाचा :  Samsung Galaxy s22 Ultra आणि Apple iphone 13 pro max पैकी कोणता फोन चांगला? जाणून घ्या

iPhone 13 बँक ऑफर

iPhone 13 वर 10 टक्के झटपट कॅशबॅक उपलब्ध आहे. तुम्ही Google Pay, PhonePe, Paytm, SBI Pay, BHIM UPI, FreeCharge, Axis Pay, Samsung Pay किंवा MobiKwik द्वारे UPI पेमेंट केल्यास तुम्हाला हजार रुपयांची सूट मिळेल. म्हणजेच फोन 73,900 हजार रुपयांत उपलब्ध होईल. त्यानंतर एक्सचेंज ऑफर देखील आहे.

आयफोन 13 एक्सचेंज ऑफर

iPhone 13 वर 18,500 रुपयांची एक्सचेंज ऑफ आहे. जर तुम्ही जुना फोन एक्सचेंज केला तर तुम्हाला इतकी सूट मिळू शकते.

परंतु तुमच्या जुन्या फोनची स्थिती चांगली असेल आणि मॉडेल नवीन असेल तरच रु. 18,500 ची सूट मिळेल. अशा सर्व सुविधा वापरून आयफोन 13  तुम्हाला 55 हजार 400 रुपयांपर्यंत मिळू शकतो.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Whatsapp शी वैर नडलं; 74 लाखांहून अधिक अकाऊंट बंद, तुमचं सुरु आहे ना?

WhatsApp News In Marathi : लोकप्रिय इन्स्टंट चॅटिंग अॅप whatsapp ने एप्रिल महिन्यात भारतात 75 …

WhatsApp वापरताना चुकूनही ‘त्या’ लिंकवर क्लिक करु नका, नाहीतर ॲप होईल क्रॅश

नवी दिल्ली :Whatsapp हे सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टन्ट मेसेजिंग ॲप आहे. व्हॉट्सॲप …