रोहित शर्माकडं विश्वविक्रम मोडण्याची संधी!

Ind Vs SL T20 Series: भारत आणि श्रीलंका यांच्यात येत्या 24 फेब्रुवारीपासून तीन सामन्याची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत भारताचा कर्णधार रोहित शर्माकडं (Rohit Sharma) विश्वविक्रम मोडण्याची संधी उपलब्ध झालीय. टी-20 क्रिकेटमध्ये रोहित शर्मा सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर करू शकतो. 

रोहित शर्माच्या नावावर 154 षटकारांची नोंद
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्टिलच्या नावावर आहे. गुप्टिलनं आतापर्यंत 112 सामन्यात 165 षटकार मारले आहेत. यादरम्यान त्यानं 287 चौकारही मारले आहेत. या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितनं टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 122 सामन्यात 154 षटकार मारले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत रोहित आणखी 12 षटकार मारले तर टी-20 क्रिकटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी झेप घेईल.

टॉप 10 खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा एकमेव भारतीय
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या पहिल्या 10 खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा एकमेव भारतीय खेळाडू आहे. या यादीत वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं आतापर्यंत 79 खेळले असून 124 षटकार मारले आहेत.त्यानंतर इंग्लंडचा फलंदाज इयॉन मॉर्गन 120 षटकारांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 120 षटकारांची नोंद आहे.

हेही वाचा :  न्यूझीलंडनं सामना गमावला पण ब्रेसवेलनं मनं जिंकली, चाहत्यांनी ठोकला कडक सॅल्यूट

भारत- श्रीलंका यांच्यातील टी-20 सामने कुठे खेळले जाणार?
आता श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे. भारता आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्याची टी-20 मालिका खेळण्यात येणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तर, दुसरा आणि तिसरा टी-20 सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर खेळण्यात येणार आहे. 

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Steve Smith IPL 2023 : स्मिथ करणार आयपीएलमध्ये पुनरागमन, स्वत:च व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

IPL 2023 News : आयपीएलचा आगामी हंगाम अर्थात 16 वा सीझन काही दिवसांतच सुरु होत …

BCCI च्या आवाहनानंतर ICC चा मोठा निर्णय; इंदूरच्या खेळपट्टीची रेटिंग बदलली

India vs Australia Indore Test Pitch: टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील चार …