‘या’ एका भीतीमुळे सलमान खानने आजपर्यंत केलं नाही लग्न, इतक्या मोठ्या अभिनेत्याला नेमकी अशी काय असावी अडचण?

इथे सगळ्या अभिनेता आणि अभिनेत्रींची लग्न होतायत, काही काहींना तर 2-3 मुलं पण झाली. मात्र बॉलीवूडचा भाई आणि दबंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानने (Salman khan) अजूनही लग्न का केलं नाही हा एक मोठा प्रश्न आज सुद्धा सगळ्यांना सतावतो. तुम्ही सलमान खांचे चाहते असाल वा नसाल पण तो एक मेगास्टार असून आजही सिंगल आयुष्य जगतोय हे कुठेतरी खटकतं. त्याच्याकडे आहे सुद्धा सगळं, त्यामुळे त्याच्याशी कोणी मुलगी लग्न करणार नाही असं देखील नाही. मग अशी काय गोष्ट आहे ज्यामुळे सलमान खान आज सुद्धा अविवाहित आहे किंबहुना त्याला तसं राहायचं आहे. तर मंडळी, पण आज तुम्हाला याचं उत्तर मिळाले कारण एका रिपोर्ट मधून हे उत्तर आम्ही शोधून काढलं आहे आणि तुम्ही देखील नक्कीच या उत्तराशी रिलेट कराल! (सभी तस्वीरें: इंडियाटाइम्स और योगेन शाह)

वेळेची समस्या

ईटी टाईम्सने एक खास रिपोर्ट शेअर केला आहे ज्यामध्ये सलमान खानच्या अत्यंत जवळच्या एका नातेवाईकाने या मागचे एक कारण शेअर केले आहे. त्यांचे म्हणणे होते की, “सलमानचे आपल्या कुटुंबावर खूप जास्त प्रेम आहे. म्हणजे तो कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रायोरीटी त्यांनाच देतो. त्यामुळे त्याला कधी कधी असे वाटते की तो कधीच आपल्या जोडीदाराला त्यापेक्षा जास्त महत्त्व देऊ शकत नाही. त्याच्यासाठी नेहमी त्याचे कुटुंब महत्त्वाचे असेल आणि म्हणून सलमानला वाटते की यामुळे त्याची बायको सुद्धा नक्कीच खुश राहणार नाही. म्हणूनच दोनदा लग्नाची बोलणी पूर्ण होऊन सुद्धा सलमानने पुढे पाय टाकला नाही.

हेही वाचा :  बापरे ! विराटचा बेडवरील तो फोटो शेअर करत अनुष्का शर्माने दिल्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

(वाचा :- माझी कहाणी : मित्राला हॉटेलच्या एका रूममध्ये एकांतात भेटणं मला पडलं महागात कारण…!)

अनेकांना असते हे टेन्शन

केवळ सलमानच नाही तर अनेक मुलांना लग्नाआधी हे टेन्शन असते. त्यांना वाटते की आपली बायको अशी असावी जी आपल्या कुटुंबाला सांभाळून घेईल. त्यांना बांधून ठेवेल. त्यांच्याशी वाईट वागणार नाही. जेव्हा असे प्रसंग येतात की बायको आणि कुटुंबियांचे पटत नाही तेव्हा एक नवरा म्हणून कोणा एकाची बाजून घेणे महत्त्वाचे होऊन बसते. अशावेळी नक्की बाजू एकाची घ्यायची म्हणजे कोणाला एकाला दुखावणे आलेच. आणि ही गोष्ट कुटुंबावर प्रेम असणाऱ्या मुलांना करायला आवडत नाही, सलमानच्या बाबतीत देखील हेच झाले.

(वाचा :- लग्नाआधीच होणा-या सूनेकडून मागितली किडनी, ‘या’ 3 महिलांनी सांगितल्या काळीज पिळवटून टाकणा-या कहाण्या..!)

आयुष शर्माचं मत

सलमान खानचा भावोजी आयुष शर्माला जेव्हा याबद्दल विचारणा करण्यात आली तेव्हा तो म्हणाला की, “सलमान समोर कोणीच लग्नाचा विषय काढत नाही कारण त्याला देखील ही गोष्ट विचारलेली आवडत नाही. शिवाय ते एवढे बिझी असतात की त्यांना याबाबत विचार करायला देखील वेळ नसतो. आणि सध्या जे लाईफ ते जगतायत त्याबाबत ते खुप खुश आहेत त्यांना त्याबाबत अजिबात खेद वाटत नाही. मला वाटतं जर त्यांच्या मनात असले तर ते लग्न करतील आणि जर त्यांनी लग्न नाही केलं तर तो सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल आणि आपण त्याचा आदर करायला हवा.”

हेही वाचा :  मला जडल्यात काही विचित्र सवयी, जर त्या मी आई-वडिलांसमोर कबूल केल्यात तर...

(वाचा :- बापरे, दोन्ही मुलांचा मृत्यु झाला नंतर नव-याची साथही सुटली, जगजीत सिंगच्या पत्नीची संपूर्ण कहाणी ऐकली तर तुम्हालाही रडू आवरणार नाही..!)

लग्नाआधी कोल्ड फिट्स

सलमानने स्वत:हून ‘कॉफी विथ करण’ मध्ये एक गोष्ट शेअर केली होती की, तो अनेकदा लग्न करण्यापासून फक्त एक पाऊल दूर होता. एवढचं काय संगीता सोबत जेव्हा त्याच नाव जोडलं गेलं तेव्हा तर लग्नाच्या पत्रिका देखील छापल्या होत्या. पण मग मला कोल्ड फिटचा अनुभव आला आणि मी ते लग्न मोडले. असे किमान 2-3 वेळा झाले आहे. कोल्ड फिटचा अर्थ आहे लग्नाच्या आधी आपली हिम्मत गमावणे किंवा ज्या आत्मविश्वासाने आपण लग्न करायला जात होतो तो आत्मविश्वासच न येणे. आपण चुकीची गोष्ट करतोय ही भावना अशावेळी निर्माण होते.

(वाचा :- सारं काही सोन्यासारखं असूनही लतादिदींनी का नाही केलं आयुष्यभर लग्न? असे निर्णय जे बदलून टाकतात संपूर्ण आयुष्य!)

रिजेक्शनची भीती

सलमानने खानने एका शो मध्ये आपले मन मोकळे करताना सांगितले होते की, त्याला रिजेक्शनची खूप जास्त भीती वाटते. लहान असताना त्याला एक मुलगी खूप आवडायची. पण ती रिजेक्ट करेल म्हणून त्याने तिला कधीच आपल्या मनातील भावना सांगितल्या नाहीत. तर मंडळी नीट जाणून घेतल्यावर लक्षात येतं की सलमानने लग्न न करण्याच्या समस्या या अत्यंत सामान्य आहे. सामान्य मुले देखील या समस्यांशी झुंजत असतात.

हेही वाचा :  माझी कहाणी : सासरच्या लोकांनी मला जेलमध्ये टाकलं आणि माझ्या प्रेग्नेंट बायकोचं जबरदस्ती दुसरं लग्न लावून दिलं, मग पुढे..!

(वाचा :- उगाच नाही लाखो मुलींमधून श्लोकाच बनली अंबानी कुटुंबाची सूनबाई, इतक्या परीक्षा पास केल्यानंतरच केली गेली निवड..!)

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मलायकाने ब्लॅक बॅकलेस गाऊनमध्ये तापवलं इंटरनेटचं वातावरण

मलायका अरोरा आणि तिचा फिटनेस हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. मलायका आपल्या फॅशनने सर्वांचेच …

संजय राऊत यांचीसुद्धा खासदारकी जाणार? हक्कभंग प्रकरणाची सुनावणी आता राज्यसभेत

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधिमंडळाबद्दल आक्षेपार्ह …