Stroke Sign : स्ट्रोक येण्याच्या ७ दिवस आधीच दिसतात ही ८ लक्षणं, वेळेत जाणून घ्या नाहीतर जीवावर बेतेल

स्ट्रोकला अनेकदा ब्रेन अटॅक देखील म्हटलं जातं. मेंदूमध्ये गरजेपेक्षा कमी रक्तपुरवठा होतो त्यावेळी ब्रेन स्ट्रोकची समस्या जाणवते. किंवा मेंदूमध्ये रक्ताच्या नसा फुटतात तेव्हा ही समस्या जाणवते. हा त्रास होणाऱ्या व्यक्तीला योग्य वेळेत उपचार मिळाले नाही तर त्याचा जीव जाऊ शकतो किंवा कायमचे अपंगत्व येण्याची दाट शक्यता असते.

अनेकांना स्ट्रोक येण्यापूर्वी काही दिवस अगोदर डोकेदुखी तसेच शरीराच्या काही भाग सुन्न होतात किंवा मुंग्या जाणवतात. अनेकजण या त्रासाला अजिबात गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे स्ट्रोक जीवावर बेततो.

स्टडीनुसार, स्ट्रोक हे जगभरातील मृत्यू आणि अपंगत्वाचे दुसरे प्रमुख कारण आहे. महत्वाचं म्हणजे भारतात अपंगत्वाचे पाचवे प्रमुख कारण आहे. अशा परिस्थितीत, नुकत्याच झालेल्या एका अभ्यासाचे निष्कर्ष तुम्हाला या किलरपासून वाचवू शकतात.

​स्ट्रोकवर करण्यात आला अभ्यास

अनेकदा स्ट्रोक येण्यापूर्वी काही शारीरिक बदल जाणवतात. अनेक रूग्णांमध्ये अभ्यासा दरम्यान या गोष्टी जाणवल्या आहेत. स्ट्रोकनुसार, ४३ टक्के रूग्णांना ब्रेन अटॅक येण्याअगोदर एक आठवडा अगोदर मिनी स्ट्रोकची लक्षणे जाणवतात.

हेही वाचा :  पेट्रोल भरायला जाण्यापूर्वी वाचा 'ही' महत्त्वाची बातमी, इंधनाचे नवे दर जारी

(वाचा – Kidney Stones आणि फुफ्फुसाची घाण साफ करण्यासाठी घरीच तयार करा २ पदार्थ, काही दिवसांत मिळेल आराम)

​काय आहे मिनी स्ट्रोक

मायोक्लिनिकनुसार, मिनी स्ट्रोकला ट्रान्सिएंट इस्केमिक अटॅक (TIA) म्हणतात. अतिशय थोड्या वेळासाठी दिसणाऱ्या या लक्षणाला स्ट्रोकचे संकेत म्हटले जातं. मिनी-स्ट्रोक हा मेंदूला रक्तपुरवठा होण्याच्या थोड्या व्यत्ययाचा परिणाम आहे. TIA सहसा फक्त काही मिनिटे टिकते आणि कायमचे नुकसान होत नाही.

(वाचा- Flax Seeds For Diabetes : साखर कंट्रोल करण्यासाठी अळशी गुणकारी, इन्सुलिन घ्यावच लागणार नाही)

​मिनी स्ट्रोकची लक्षणे

NHS च्या म्हणण्यानुसार, स्ट्रोकप्रमाणेच मिनी स्ट्रोकची लक्षणे सामान्यपणे अचानक जाणवतात. या लक्षणांना समजून घ्या.

  • चेहऱ्याच्या किंवा शरीराच्या एका बाजूला पॅरालिसिस
  • स्पष्ट बोलण्यास होणार त्रास
  • आंधळेपणा
  • डबल विझन
  • चालताना तोल जाणे
  • हात सुन्न होणे
  • कोणतीही गोष्ट समजून घेण्यास त्रास होणे
  • चक्कर येणे

(वाचा – Causes of Belly Fat: दररोज पोटावरची चरबी वाढतेय, शर्टच्या बटनातून ढेरी डोकावतेय? तुमच्या ७ चुकाच याला कारणीभूत)

​मिनी स्ट्रोककरता रिस्क फॅक्टर

क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, स्ट्रोकचा कौटुंबिक इतिहास, 55 वर्षांपेक्षा जास्त वय, उच्च रक्तदाब, शारीरिक हालचालींचा अभाव, मधुमेह, हृदयविकार, धूम्रपान, लठ्ठपणा यासारख्या घटकांमुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.

हेही वाचा :  पोटात वेदना, किडनी स्टोन किंवा मुतखडा यासोबत ही 6 लक्षणे किडनीतील रक्ताच्या गाठीचे संकेत

(वाचा – Juice For Weight Loss : लठ्ठपणामुळे सगळीकडून लोंबकळते चरबी, या ५ ज्यूसने झपाट्याने कमी होईल वजन)

कसा कराव बचाव

निरोगी जीवनासाठी संतुलित जीवनशैली असणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, स्ट्रोक टाळण्यासाठी धूम्रपान टाळणे, नियमित व्यायाम, हिरव्या भाज्या आणि फळांचा संतुलित आहार, निरोगी वजन यासारख्या घटकांकडे लक्ष देणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

(वाचा – Worst Indian Breakfast : अजिबात चांगले नाहीत हे ५ इंडियन ब्रेकफास्ट, खाणाऱ्यांना जडतील भयंकर आजार))

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …