‘अंधारातून पुन्हा प्रकाशात…’; शाहरुखची खास पोस्ट व्हायरल

Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. शाहरुखचा कमबॅक हा ब्लॉकबस्टर झाला आहे. शाहरुखच्या पठाण चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. या चित्रपटानं भारताबरोबरच परदेशातील बॉक्स ऑफिसवर देखील कोट्यवधींची कमाई केली आहे. आता पठाण चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल शाहरुख खाननं त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्यानं ट्विटरवर एक खास फोटो शेअर करुन चाहत्यांचे आभार मानले.   

शाहरुखचं ट्वीट

शाहरुखनं ट्विटरवर त्याचा एक सेल्फी शेअर केला आहे. या सेल्फीमध्ये शाहरुखच्या मागे सूर्यकिरण दिसत आहेत.  शाहरुख खान हा फोटो शेअर करुन ट्वीटमध्ये लिहिलं, ‘सूर्य एकटा आहे. तो जळतोय. तो अंधारातून पुन्हा प्रकाशात येतो. पठाणवर एवढं प्रेम आणि चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद! ‘ शाहरुखच्या चाहत्यांनी त्याच्या या ट्वीटवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. शाहरुखच्या या ट्वीटला 55 हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी लाइक केलं आहे. तर सात हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी त्याच्या या ट्वीटला रिट्वीट केलं आहे.

पठाण ठरला ब्लॉकबस्टर

शाहरुख खानच्या पठाण हा चित्रपट रिलीज होऊन 14 दिवस झाले आहे. 14 दिवसांमध्ये या चित्रपटानं जगभरात 850 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. तर भारतामध्ये या चित्रपटानं 446.20 कोटींचं कलेक्शन केलं आहे. हा चित्रपट भारतामध्ये 500 कोटीचा टप्पा पार करेल, असा अंदाज लावला जात आहे. 

हेही वाचा :  Aamir Khan : मुलीच्या साखरपुड्यात थिरकला आमिर; व्हिडीओ व्हायरल

पठाणची स्टार कास्ट

पठाण चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पादुकोण (Deepika Padukone), जॉन अब्राहम (John Abraham), आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात अभिनेता सलमान खाननं देखील कॅमिओ केला आहे. शाहरुखनं पठाण चित्रपटात एका रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील शाहरुख आणि दीपिकाच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

पठाणमधील गाणी झाली हिट

पठाण चित्रपटामधील गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटामधील झुमे जो पठाण (Jhoome Jo Pathaan) आणि बेशरम रंग (Besharam Rang) या दोन गाण्यांवरील रिल्स नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …