चिमुकलीच्या व्हायरल व्हिडीओला शाहरुखचा भन्नाट रिप्लाय, म्हणाला, ‘देशाच्या तरुण पिढीचा…’

Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा पठाण (Pathaan) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. पण सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अहाना नावाच्या मुलीचा आहे. ही मुलगी व्हिडीओमध्ये ‘पठाण आवडला नाही’ असं म्हणत आहे. या व्हिडीओला शाहरुख खाननं दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

अहाना म्हणते, ‘पठाण आवडला नाही.’

अहानाच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तिला ‘कोणता चित्रपट बघायला गेली होतीस’ असा प्रश्न विचारण्यात येतो. त्यावर ती उत्तर पठाण असं देते त्यानंतर ‘तुला चित्रपट आवडला का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नला ती उत्तर देते, ‘नाही’. या व्हिडीओला शाहरुखनं रिप्लाय दिला आहे. 

शाहरुखचा रिप्लाय 

शाहरुखनं अहानाच्या व्हायरलला रिप्लाय देत लिहिलं, ‘अरे अरे!! आता मला जास्त मेहनत करावी लागेल. मी तरुण प्रेक्षकांना निराश होऊ देऊ शकत नाही, शेवटी देशाच्या तरुण पिढीचा प्रश्न आहे. कृपया तिला DDLJ दाखवा. कदाचित तिला रोमँटिक चित्रपट आवडत असतील. लहान मुलांच्या काही गोष्टी लक्षात येत नाहीत.’ शाहरुखच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

हेही वाचा :  Suhana Khan : शाहरुखचा ‘पठाण’ लूक पाहून लेक सुहानाही स्तब्ध! फोटो रीपोस्ट करत म्हणाली...

पाहा व्हिडीओ

पठाण चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात अभिनेता सलमान खाननं देखील कॅमिओ केला आहे. पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे.  हिंदी, तामिळ, तेलुगू  या भाषांमध्ये पठाण हा चित्रपट रिलीज झाला. 

शाहरुखचे आगामी चित्रपट

राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ या आगामी चित्रपटामध्ये शाहरुख प्रमुख भूमिका साकारणार आहे.  तसेच त्याचा ‘जवान’ हा आगामी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Shah Rukh Khan: ‘एका महिन्यात किती कमावतो?’ ‘नावात खान का?’; चाहत्यांचे प्रश्न; शाहरुख खानची भन्नाट उत्तरं



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …