शाहरुखनं खास पोस्ट शेअर करुन दीपिकाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Deepika Padukone: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone)आज (5 जानेवारी) 37 वा वाढदिवस आहे. दीपिका तिच्या अभिनयानं आणि स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. दीपिका ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या ‘पठाण’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा प्रमुख भूमिका साकारणार आहे. नुकतीच शाहरुखनं दीपिकाच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. 

शाहरुखची पोस्ट

शाहरुखनं ट्विटरवर दीपिकाच्या पठाणमधील लूकचा फोटो शेअर केला. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, ‘प्रिय दीपिका पदुकोण, विविध भूमिकेतून तू स्क्रिनवर येऊन अनेकांचे लक्ष वेधतेस. मला तुझा नेहमी अभिमान वाटती.  यशाच्या उंच शिखरावर तू जावं, त्यासाठी तुला शुभेच्छा. तसेच  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप प्रेम’ शाहरुखनं शेअर केलेल्या या दीपिकाच्या पठाण चित्रपटामधील लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.


 ‘पठाण’ चित्रपटातील बेशरम रंग गाण्यामधील दीपिकाच्या बिकिनी लूकवरून वाद सुरु झाला. बेशरम रंग या गाण्यात अभिनेत्री दीपिकानं घातलेल्या बिकीनीच्या रंगावर काही लोकांनी आक्षेप घेतला आहे. पठाणबरोबरच दीपिकाचे ‘द इंटर्न’, ‘फाइटर’ हे आगामी चित्रपटा देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.  

हेही वाचा :  Bachchan Pandey : खिलाडी अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'चे नवे पोस्टर प्रदर्शित

पठाण हा चित्रपट 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. शाहरुखसोबत दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Happy Birthday Deepika Padukone: कोट्यवधींची मालकीण आहे दीपिका; फिफा वर्ल्ड कप अन् बेशरम रंगमधील बिकीनी, या कारणांमुळे चर्चेत



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …