‘राम लखन’ ते ‘रंगीला’; 150 हून अधिक सिनेमांत आपल्या अभिनयाची छाप सोडणारा Jackie Shroff

Jackie Shroff Birthday : बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आज वाढदिवस आहे. ‘बॉलिवूडचा भिडू’ अशी ओळख असलेला जॅकी रोमॅंटिक हीरोपासून ते अॅक्शन हिरोपर्यंत वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या चार दशकांपासून जॅकी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

जॅकीचा हीरोपर्यंत प्रवास…

जॅकी श्रॉफने आपल्या करिअरच्या टप्प्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. जॅकीने 1973 साली ‘हीरा पन्ना’ या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर 1982 साली ‘स्वामी दादा’ या सिनेमाच्या माध्यमातून त्याने पुन्हा एकदा सिनेसृष्टीत कमबॅक केलं. त्याचे हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडले. पण 1983 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘हीरो’ (Hero) या सिनेमाने त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. 

जॅकी श्रॉफचे लोकप्रिय सिनेमे (Jackie Shroff Popular Movies) 

जॅकी श्रॉफने आजवर 150 हून अधिक सिनेमांत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. नव्वदच्या दशकातील सुपरहिट अभिनेत्यांच्या यादीत जॅकी श्रॉफची गणना होते. आपल्या दर्जेदार अभिनयाने त्याने प्रेक्षकांना आपलसं केलं आहे. रुपेरी पडद्यावर वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका साकारत त्याने सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ‘सौदागर’, ‘राम लखन’, ‘रंगीला’, ‘बॉर्डर’, ‘रुप की राणी चोरों का राजा’ असे अनेक सुपरहिट सिनेमे जॅकीने बॉलिवूडला दिले आहेत. त्याच्या सिनेमांतील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. ‘जग्गु दादा’ म्हणून तो बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आहे.

हेही वाचा :  सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीनं शेअर केली पोस्ट; म्हणाली, 'हा चित्रपट...'

जॅकी श्रॉफच्या संघर्षाची कहाणी 

जॅकी आज एक लोकप्रिय अभिनेता असला तरी या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला आहे. एका मुलाखतीत जॅकी म्हणाला होता, “मला वाटतं एखादी गोष्ट साध्य करताना अनेक गोष्टी करायच्या राहून जातात. आयुष्यात मला ज्या गोष्टी कराव्याश्या वाटल्या, त्या मी आवडीने केल्या आहेत. तुम्हाला कोणत्या गोष्टी योग्य आणि कोणत्या अयोग्य आहेत हे कळल्या पाहिजेत.” 

जॅकी पुढे म्हणाला, “माझ्यावरचं कर्ज मी कुटुंबीयांना त्रास न देता स्वत: फेडलं आहे. त्यावेळी आमची परिस्थिती बेताची असली तरी त्याची झळ आम्ही कधीच मुलाबाळांना लागू दिली नाही. कर्ज फेडण्यासाठी घरापासून ते फर्नीचरपासून अनेक गोष्टी विकाव्या लागल्या. त्यावेळी मी मुंबईतील तीन बत्ती येथील चाळीत राहायला गेलो होतो. या चाळीत पाच ते सहा वर्ष काढली.” 

जॅकी श्रॉफने हिंदीसह, मराठी, बंगाली, कन्नड, तेलुगू, मल्याळम, पंजाबी, तामिळ अशा वेगवेगळ्या भाषांतील सिनेमांत काम केलं आहे. ‘हीरो’ सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर जॅकीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. जॅकीचा ‘कोटेशन गँग’ (Quotattion Gang) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 

हेही वाचा :  अबोला..भांडण ते लग्न; प्रसाद-मंजिरीचा 25 वर्षांचा सुखी संसार

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Quotation Gang Trailer: अंगावर शहारे आणणारा ‘कोटेशन गँग’चा ट्रेलर रिलीज; सनी लिओनी, जॅकी श्रॉफ प्रमुख भूमिकेत

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …