शुभवार्ता! जिल्हा रुग्णालयांमध्येही ‘डीएनबी’अभ्यासक्रम; सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत निर्णय

नाशिक : वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाची पदव्युत्तर पदवी असलेला डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड (डीएनबी) हा अभ्यासक्रम आता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जिल्हा रुग्णालयांमध्येही राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशल बोर्ड ऑफ एग्झामिनेशनमार्फत (एनबीई) मान्यता देण्यात आलेल्या जिल्हा रुग्णालयांमध्येच यंदापासून हा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे.

‘डीएनबी’ या तीन वर्षांच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ‘एनबीई’मार्फत घेतली जाणार प्रवेश परीक्षा द्यावी लागते. ‘एमबीबीएस’चा अभ्यास पूर्ण केल्यानंतर डॉक्टरांना या अभ्यासक्रमाला प्रवेश परीक्षाच्या माध्यमातून प्रवेश घेता येतो. यापूर्वी हा अभ्यासक्रम ‘एनबीई’मार्फत काही मान्यताप्राप्त हॉस्पिटल्समध्ये राबविला जात होता. परंतु, यंदापासून सार्वजिनक आरोग्य विभागाच्या जिल्हा रुग्णालयांमध्ये हा अभ्यासक्रम राबविला जाणार असल्याचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जाहीर करण्यात आला आहे. ‘डीएनबी’ हा अभ्यासक्रम जिल्हा रुग्णालयांमध्ये राबविण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘एनबीई’कडे काही जिल्हा रुग्णालयांचे प्रस्ताव दाखल केले होते. मूल्यांकनानंतर ‘एनबीई’मार्फत ज्या संस्थांना मान्यता दिली आहे, अशा जिल्हा रुग्णालयांमध्ये यंदापासून हा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे.

हे लक्षात असू द्या…

– अभ्यासक्रमाकरिता उपलब्ध होणाऱ्या ५० टक्के जागा या विभागातील सेवांतर्गत अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार

हेही वाचा :  खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांची भरती

– अधिकाऱ्यांना हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर ३ वर्षे बंधपत्रित सेवा पूर्ण करावी लागणार

– सेवा पूर्ण न केल्यास पन्नास लाख दंड भरावा लागणार, तसेच सरकार वेळोवेळी विहित करेल ती बंधपत्राची रक्कम दंड म्हणून भरावी लागणार

– ‘डीएनबी’ला प्रवेश मिळाल्यानंतर प्रवेश घेऊन शैक्षणिक कालावधी पूर्ण न करता जागा सोडणाऱ्या उमेदवारांकडून १० लाख दंडवसुली

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …