सासऱ्यांनी केली किडनीची मागणी
मी माझ्या बॉयफ्रेंड सोबत 5 वर्षे रिलेशनशिप मध्ये होते आणि तेव्हा माझा त्याच्यावर खूप विश्वास देखील होता. त्याने आणि त्याच्या घरातल्या मंडळींनी लग्नात आम्हाला काही नको आणि आम्ही हुंडा घेत नाही असे सांगितले. पण जेव्हा लग्न ठरले तेव्हा माझा बॉयफ्रेंड म्हणाला की, माझे सासरे अर्थात त्याचे वडील अपेक्षा करतायत की माझी एक किडनी मी त्यांना द्यावी, त्या एका किडनीवर ते अजून जगू शकले असते. माझ्या परवानगीविना माझ्या बॉयफ्रेंडने माझी किडनी टेस्ट केली. हे जेव्हा मला कळले तेव्हा मी लग्न मोडले. पण हा अनुभव खरंच खूप बेक्कार होता.
(वाचा :- या राज्यात रविवारी किस करण्यास आहे सक्त मनाई, किसिंगशी निगडीत ‘या’ 5 रंजक गोष्टी वाचल्यावर व्हाल हैराण..!)
महागड्या गाडीची अपेक्षा
लग्नात माझ्या सासरच्या लोकांनी आमच्याकडून महागड्या ऑडी कारची अपेक्षा केली होती. त्यांना वाटत होतं की पाठवणीवेळी ही कार माझ्या वडिलांनी द्यावी. पण मला माहित होतं की लग्नाचा हा सगळा खर्च करून झाल्यावर माझ्या वडिलांना पुन्हा कारसाठी पैसे खर्च करणे शक्य नव्हते. ही आवाक्याबाहेरची गोष्ट होती, मला या अचानक करण्यात आलेल्या मागणीचा राग आला होता. तरी मी म्हटले की, माझा नवरा आणि मी मिळून ही कार खरेदी करू. त्यानंतर या कारचा विषय कोणीच काढला नाही. पण आमचे मनभेद मात्र कायमचे झाले.
(वाचा :- बापरे, दोन्ही मुलांचा मृत्यु झाला नंतर नव-याची साथही सुटली, जगजीत सिंगच्या पत्नीची संपूर्ण कहाणी ऐकली तर तुम्हालाही रडू आवरणार नाही..!)
फ्लॅटची मागणी
लग्नानंतर माझ्या सासू सासऱ्यांनी माझ्या आई वडिलांना घरी बोलवले आणि त्यांना मुलाच्या नावावर एक 3 BHK फ्लॅट खरेदी करण्यास सांगितले. हा फ्लॅट 10 व्या मजल्यावर असावा अशी सुद्धा त्यांची अपेक्षा होती. ही गोष्ट मला वा माझ्या नवऱ्याला माहित नव्हती. पण जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा साहजिकच आम्ही दोघांनी सुद्धा या गोष्टीला विरोध केला. माझ्या सासू सासऱ्यांचे म्हणणे होते की ते आमच्या भविष्यासाठीच हा फ्लॅट मागत होते. पण माझ्या मते हा एक प्रकारचा हुंडाच होता.
(वाचा :- सारं काही सोन्यासारखं असूनही लतादिदींनी का नाही केलं आयुष्यभर लग्न? असे निर्णय जे बदलून टाकतात संपूर्ण आयुष्य!)
हुंडा हद्दपार व्हावा
तर मंडळी, याअशा मागण्या ऐकून वा अनुभव वाचून तुम्हाला सुद्धा कळले असेलच की हा किती गंभीर विषय आहे. पूर्वी लोक थेट हुंडा मागायचे आणि आता अप्रत्यक्षपणे मागतात. त्यामुळे हुंडा पद्धत बंद झाली आहे असे आपण म्हणूच शकत नाही. जर आपल्याला खरंच हुंडा पद्धत बंद करायची असेल तर लोकांना याबाबत सुशिक्षित करायला हवे. येणाऱ्या पिढीला हुंडामुक्त समाजाचे बाळकडू आतापासूनच पाजणे महत्त्वाचे आहे.
(वाचा :- या लाल लेहग्यांतील झिरो फिगर बंगाली नवरीला पाहून वाढली चाहत्यांच्या हृदयाची धडधड, बंगाली विधींमधून उलगडला नात्याचा नवा अर्थ..!)
कायद्यानुसार काय शिक्षा आहे?
हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल कायद्यात शिक्षा आहे. हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 च्या कलम 3 अन्वये हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल कमीत कमी 5 वर्षे कारावासाची आणि कमीत कमी रुपये 15,000/- अथवा अशा हुंडयाच्या मुल्याइतकी रक्कम यापैकी जी रक्कम जास्त असेल इतक्या रक्कमेची दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे. हुंडा मागण्याबद्दल शिक्षा म्हणून हुंडा प्रतिबंधक कायदा, 1961 च्या कलम 4 अन्वये कोणत्याही व्यक्तीने हुंडा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे मागितल्यास त्यास कमीत कमी 6 महिने व जास्तीत जास्त 2 वर्षांपर्यंतच्या मुदतीची कारावासाची आणि रुपये 10,000/- पर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. कायदा बाजूने असल्यामुळे मुलींनीही अशा प्रकाराला न घाबरता समोर येऊन विरोध करायला हवा, शिवाय गैरफायदा घेणा-यांमुळे खरोखर जे पिडीत असतात त्यांना मदत मिळू शकत नाही. त्यामुळे जे लोक कायद्याचा गैरफायद घेतात त्यांनाही वेळीच शिक्षा मिळावी म्हणून प्रयत्न करावेत.
(वाचा :- उगाच नाही लाखो मुलींमधून श्लोकाच बनली अंबानी कुटुंबाची सूनबाई, इतक्या परीक्षा पास केल्यानंतरच केली गेली निवड..!)