माझी कहाणी : मित्राला हॉटेलच्या एका रूममध्ये एकांतात भेटणं मला पडलं महागात कारण…!

प्रश्न – मी एक 50 वर्षांची विवाहित महिला आहे. माझा संसार खूप सुखी होता, पण अचानक माझ्या आयुष्यात माझा एक जुना मित्र आला आणि माझ्या हसत्या खेळत्या आयुष्यातला जणू ग्रहणच लागलं. आम्ही दोघे एकमेकांना 30 वर्षांनी भेटत असल्याने आम्ही खूप जास्त उत्सुक होतो. आम्ही एका हॉटेल मध्ये भेटायचे ठरवले. ही 5 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आम्ही जरी असे भेटलो असलो तरी आमच्यात कोणतीच गोष्ट घडली नाही. हो एक चूकी अशी झाली की आम्ही एकत्र फोटो काढला आणि तेव्हापासून गेली 5 वर्षे माझ्या नवऱ्याच्या मनात संशय निर्माण झाला आहे की माझे मित्रासोबत विवाहबाह्य संबंध आहेत.

मी अनेक परिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट घरात इतरांपर्यंत पोहोचली, तेव्हा माझ्या नवऱ्याने नव्याने सुरुवात करू असे आश्वासन दिले, पण तसं काही एक झालेच नाही. या एका संशयावरून माझा वाईट मानसिक व शारीरिक छळ सुरु आहे. यामुळे सतत आत्महत्येचा विचार माझ्या मनात येतो. मला कळत नाहीये मी हे सगळं कसं थांबवू. मी पूर्णपणे तुटले आहे. मी पूर्णपणे एकटी पडली आहे. मला काहीच समजत नाहीये की मी काय करू म्हणजे माझ्या कुटुंबीयांना माझ्यावर विश्वास बसेल की मी काहीच चुकीचे केले नाहीये. (गोपनीयतेच्या नियमानुसार आम्ही व्यक्तीची ओळख उघड करत नाही.)

जाणकारांचे उत्तर

काउंसलिंग साइकोलॉजिस्ट आणि सायकोथेरेपिस्ट डॉ अनामिका पापडीवाल यांनी या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले की, तुमची परिस्थिती मी समजू शकते. अशा पद्धतीने संशयी वातावरणात जगणे हे खूप कठीण असते. मात्र आत्महत्येचा विचार मनातून काढून टाका. जर असे पाऊल तुम्ही उचलले तर तुम्हीच चुकीच्या होतात म्हणून असे पाऊल उचलले असे समाज समजू लागेल आणि तुमच्यावरील कलंक आजन्म तसाच राहिल. चुक तुमच्याकडून सुद्धा झाली आहे हे अजिबात नाकारता येणार नाही. तुम्ही लपून-छपून मित्राला भेटायला गेलात, इतर ठिकाणी न भेटता एका रूममध्ये भेटलात ही तुमची चूक आहे. पण आता जे झालंय त्याचा विचार करणं सोडून सर्वांना थोडा वेळ द्या, ते सुद्धा कोणतीही अपेक्षा न ठेवता. हळूहळू तुमच्या वागण्यातूनच तुमची बाजू त्यांना पटेल आणि सारं काही पुर्ववत होईल.

हेही वाचा :  कोणालाच नाही अशी घाणेरडी सवय नव-याला आहे, त्या एका सवयीने केलंय माझ्या आयुष्याचं वाटोळ

(वाचा :- लग्नाआधीच होणा-या सूनेकडून मागितली किडनी, ‘या’ 3 महिलांनी सांगितल्या काळीज पिळवटून टाकणा-या कहाण्या..!)

स्वत:ला सिद्ध करण्याचा अट्टहास नको

तुम्ही आता स्वत:हून स्वत:ला सिद्ध करू शकत नाही हे वास्तव आहे. ही अशी गोष्ट आहे ज्यात व्यक्ती संशयाच्या नावाखाली आंधळा झालेला असतो. तुम्ही जेवढी ही गोष्ट स्पष्ट करण्याचा प्रयत्न कराल तेवढा अधिक संशय बळावू शकतो. त्यामुळे गोष्टी अशाच सोडून द्या. काही समस्यांवर वेळ हेच योग्य उत्तर असतं. तुम्ही शांत राहा आणि तुमच्या नवऱ्याला व मुलांना थोडा वेळ द्या. तुम्ही सामान्यपणे तुमचं आयुष्य जगायला सुरुवात करा आणि पहिल्यासारखं त्यांच्यासाठी सारं काही करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांचा विश्वास हळू हळू पुन्हा परत येऊ शकतो. मनात आशा ठेवा की तुमच्या वरचा हा कलंक नक्कीच पुसला जाईल.

(वाचा :- या राज्यात रविवारी किस करण्यास आहे सक्त मनाई, किसिंगशी निगडीत ‘या’ 5 रंजक गोष्टी वाचल्यावर व्हाल हैराण..!)

संशयाचे कारण

नवऱ्याच्या मनात संशय निर्माण होण्याचे कारण तुम्ही स्वत: सुद्धा आहात हे तुम्ही मान्य करायला हवे. जर तुम्ही मित्राला भेटायला जाताना आपल्या पतीला सांगून गेला असतात वा त्याला कल्पना दिली असती तर कदाचित आज ही परिस्थिती नसती. पण तुम्ही त्याच्या पासून लपून ही गोष्ट केली आणि जेव्हा त्याने हॉटेलच्या बंद खोलीमधला फोटो पाहिला तेव्हा त्याच्या मनात संशय निर्माण होणं सहाजिकच आहे. तो फोटो तुम्ही त्याला धोका देताय हे सांगण्यासाठी पुरेसा ठरला जे योग्यच आहे. तुम्ही कदाचित तुमच्या नवऱ्याला घाबरता, त्यांना अशा गोष्टी सांगू शकत नाही आणि म्हणून तुम्हाला कदाचित ही गोष्ट लपून करावी लागली असावी. त्यामुळे संवाद वाढवण्याचा प्रयत्न करा.

हेही वाचा :  रमजानला खाल्ल्या जाणाऱ्या खजुराचे आहेत जादुई फायदे, रोज सकाळी खा भिजवलेले ४ खजूर

(वाचा :- बापरे, दोन्ही मुलांचा मृत्यु झाला नंतर नव-याची साथही सुटली, जगजीत सिंगच्या पत्नीची संपूर्ण कहाणी ऐकली तर तुम्हालाही रडू आवरणार नाही..!)

मॅरिज कॉन्सिलिंग

अशा स्थितीमध्ये तुम्ही मॅरिज कॉन्सिलिंग नक्कीच घेतली पाहिजे. जाणकार व्यक्ती तुम्हाला यातून हळूहळू बाहेर पडण्याचा मार्ग दाखवू शकतो. शिवाय तुम्हाला जो सध्या मानसिक आधार हवाय तो तुम्हाला त्यांच्याकडूनच मिळू शकतो. जर वेळीच योग्य मॅरिज कौन्सिलिंग घेतली नाही तर कदाचित त्याचा परिणाम तुमच्या तब्येतीवर होऊ शकतो. बाहेरून तुम्ही लोकांना ठीक वाटाल पण आतून तुम्ही पूर्णपणे तुटलेल्या असाल. त्यौले एका प्रोफेशनल मॅरिज कौन्सिलिंगचे सेशन नक्की घ्या. नात्यात मतभेद असू शकतात पण मनभेद कधीच नसावेत हे लक्षात ठेवा. तसे झाले तर ते नाते पुन्हा चांगले होण्याची आशाच केली जाऊ शकत नाही.

(वाचा :- सारं काही सोन्यासारखं असूनही लतादिदींनी का नाही केलं आयुष्यभर लग्न? असे निर्णय जे बदलून टाकतात संपूर्ण आयुष्य!)

संशय ही एक कीड आहे

अनेक नाती ही संशयामुळेच तुटतात किंवा त्यांच्यात आयुष्यभराचे मनभेद निर्माण होतात. संशय ही अशी गोष्ट आहे जी हसत्या खेळत्या कुटुंबाला उध्वस्त करू शकते. बऱ्याचदा संशय हा गैरसमजातून निर्माण होतो. त्यामुळे असे गैरसमज मुळातच होणार नाहीत याची काळजी घ्या. जरी झाले तरी ते लगेच दूर करा. तुम्ही शांत राहिलात किंवा त्यावर प्रत्युत्तर दिले तर संशय अधिक वाढतो. यावर सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे पती आणि पत्नी मध्ये संवाद हवा, जर संवाद असेल तर संशय सहसा निर्माण होत नाही.

हेही वाचा :  Russia Ukraine War : यूक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की रूग्णालयात, फोटो व्हायरल

(वाचा :- या लाल लेहग्यांतील झिरो फिगर बंगाली नवरीला पाहून वाढली चाहत्यांच्या हृदयाची धडधड, बंगाली विधींमधून उलगडला नात्याचा नवा अर्थ..!)

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Viral Video : प्रयोगशाळेत जन्मलेल्या माशाच्या एका तुकड्यासाठी मोजावे लागतायत 265.954520 रुपये

Trending News : जगाच्या पाठीवर दर दिवशी असंख्य संशोधनं होत असतात. अनेक नवनवीन गोष्टी जगासमोर …

कॅनडामध्ये Most Wanted खलिस्तानी दहशतवादी सुक्खा सिंगची हत्या; 2017 पासून होता फरार

Most Wanted Criminal Sukhdool Singh Shot Dead: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची जून महिन्यात हत्या झाल्याच्या …