वाढला आहे किसिंग टाईम

एका रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, आजच्या काळात किसिंग टाईम पूर्वीपेक्षा वाढला आहे. सामान्यत: कपल्स 12 सेकंद किस करतात, पण 1980 च्या काळात हा कालावधी खूपच कमी होता. त्या काळात कपल्स फक्त 5.5 सेकंदच किस करायचे आणि एकमेकांपासून वेगळे व्हायचे. पण हा डेटा नक्की कोणी काढला आहे आणि याला काही आधार आहे हे मात्र समजू शकलेले नाही. पण आजच्या पिढीचा बोल्डनेस पाहता ही गोष्ट खरी सुद्धा असू शकते.
(वाचा :- बापरे, दोन्ही मुलांचा मृत्यु झाला नंतर नव-याची साथही सुटली, जगजीत सिंगच्या पत्नीची संपूर्ण कहाणी ऐकली तर तुम्हालाही रडू आवरणार नाही..!)
जपानमधील किसचा अर्थ

जगभरात किस बाबत लोकांच्या वेगवगेळ्या कल्पना आहे आणि विचार आहेत. त्याच आधारावर प्रत्येकजण आपापल्या परीने किसचा अर्थ लावत असतो. सुरुवातीचे किस हे फक्त अफेक्शन डिस्प्ले सारखे असते. तर कधी कधी किस हे एका रिलेशनशिपला दुसऱ्या टप्प्यावर घेऊन जाते किंवा त्यांच्यात अधिक प्रेम घडवून आणते. जपान मध्ये मात्र किसचा अर्थ अजून थोडा वेगळा आहे. जपान मध्ये जेव्हा दोन व्यक्ती किस करतात तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की त्यांना त्या व्यक्तीसोबत फिजिकली इंटीमेट व्हायचे आहे.
(वाचा :- सारं काही सोन्यासारखं असूनही लतादिदींनी का नाही केलं आयुष्यभर लग्न? असे निर्णय जे बदलून टाकतात संपूर्ण आयुष्य!)
केवळ मनुष्यच किस करत नाहीत

किसिंग हे केवळ मनुष्यच करतो असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. किसिंग ही गोष्ट प्राण्यांमध्ये सुद्धा आढळली जाते. ही गोष्ट वैज्ञानिकांनी सिद्ध केली आहे. ते प्राणी असले तरी त्यांच्यात सुद्धा भावना असतात आणि त्या भावना जाहीर करण्यासाठी ते किसचा आधार घेतात. याचा अर्थ हा आहे की किस हे केवळ एक इंस्टिंक्ट जे मानव जातीच्या उत्पत्तीपासून आढळते आहे. आणि जस जसा काळ बदलला तस तसा त्यामध्ये बदल होत गेला आहे.
(वाचा :- या लाल लेहग्यांतील झिरो फिगर बंगाली नवरीला पाहून वाढली चाहत्यांच्या हृदयाची धडधड, बंगाली विधींमधून उलगडला नात्याचा नवा अर्थ..!)
उजव्या बाजूला डोके झुकवणे

फिलेमेटलॉजीच्या फिल्ड मध्ये केल्या गेलेल्या एका अभ्यासात हे दिसून आले आहे की लोकं कीस करताना सर्वात जास्त वेळा डोके हे उजव्या बाजूला झुकवतात. या अभ्यासानुसार प्रत्येक तीन पैकी दोन व्यक्ती या आपले डोके उजव्या बाजूला झुकवतात. जर तुम्ही सुद्धा असेल करत असला तर त्यात काही चुकीचे नाही कारण ही एक सामान्य गोष्ट आहे. तुम्हाला ही गोष्ट खोटी वाटत असेल तर किस करणाऱ्या दोन व्यक्तींकडे नीट पहा तुम्हाला स्वत:लाच ही गोष्ट जाणवेल. पण हो ही गोष्ट आपल्या रिस्क वर करा. मार पडला तर आम्ही जबाबदार नाही.
(वाचा :- उगाच नाही लाखो मुलींमधून श्लोकाच बनली अंबानी कुटुंबाची सूनबाई, इतक्या परीक्षा पास केल्यानंतरच केली गेली निवड..!)
रविवारी किस करण्यास आहे मनाई

अमेरिकेमधील मिशिगन आणि कनेटिकट राज्यांत रविवारच्या दिवशी पब्लिक प्लेस मध्ये किस करण्यास सक्त मनाई आहे. याचे कारण म्हणजे रविवारचा दिवस हा ख्रिश्चन धर्मियांच्या प्रार्थनेचा दिवस असतो आणि त्यामुळे नैतिकदृष्ट्या ही गोष्ट अशा पवित्र दिनी करणे तेथील लोक चुकीचे समजतात. पण जर तुम्ही इंटरनेटवर व्हिडीओ पाहिले तर लक्षात येईल की तिकडची आताची नवीन पिढी मात्र असलं काही मानायला तयार नाही. त्यामुळे हळूहळू तेथील हे चित्र बदलले आणि रविवारचे सुद्धा लोक पब्लिकली किस करू लागले तर नवल वाटायला नको.
(वाचा :- माझी कहाणी : नणंदेच्या संशयामुळे नवरा कायमचा माझ्यापासून दूर गेला, नणंदेला वाटतं मी बायसेक्शुअल आहे कारण..!)