प्रवाशांनी गच्च भरलेल्या विमानावर कोसळली वीज

Lightning strikes plane: आर्कान्सासमध्ये वादळाच्या वेळी प्रवाशांनी गच्च भरलेल्या विमानावर वीज कोसळली. लॅंडीग करताना अमेरिकन ईगल विमानावर विजेचा कडकडाट झाला. अर्कान्समध्ये एम्ब्रेर E175 हे  विमान गेट लॅंड होण्याआधी वादळ जाण्याची वाट पाहत होते. ही वाट पाहत असताना विमानावर वीज कोसळली. 

व्हायरल प्रेसमध्ये काम करणाऱ्या कॅमेरामन जेसन विल्यम हॅम यांनी  झालेल्या घटनेबद्दल माहिती दिली. सुरुवातीला वीज विमानावर कोसळली असेल असे मला वाटले नाही पण हा एक अद्भुत व्हिडीओ बनला असता, असे ते म्हणाले. काही सेकंदांनंतर आणखी एक भयंकर वीज विमानाच्या शेपटीवर आदळली, ज्यामुळे लोकांमध्ये खळबळ माजली. डेली मेलने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

वीज पाहून काहीजण ‘वाह’, असे ओरडले. तर काहींनी याचे परिणाम चांगले होणार नाहीत असे म्हटले. दरम्यान विमानच्या शेपटीच्या भागातून ठिणगी दिसू लागली. 

वीजेच्या आघातानंतरही विमान गेटपर्यंत चालविले गेले. काय नुकसान झाले का? हे पाहण्यासाठी टेक्निशियन आत येण्याआधीच प्रवासी खाली उतरले होते. विमान ठीक होते. वादळामुळे टॅक्सीवेवर लांबलचक प्रतीक्षा केल्यानंतर विमान नेहमीसारखेच गेटपर्यंत पोहोचल्याचे विल्यम्स म्हणाले.

एम्ब्रेर E175 वर वीज पडण्याची ही पहिली घटना नाही. 140 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान लँडिंगसाठी तयार असताना त्यावर वीज पडल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता. 

हेही वाचा :  Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?

बोईंग 737 MAX विमान अंदाजे 30,000 फुटांवर उड्डाण करत होते आणि पनामा शहरातील टोकुमेन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्यासाठी येत होते. वैमानिक जोरदार वादळातून मार्गक्रमण करत असताना विमानाच्या पुढच्या टोकाला एक शक्तिशाली विजेचा धक्का बसला.  कॉकपिटमधून कॅप्चर केलेल्या नाट्यमय फुटेजमध्ये सर्व दिसले. जवळजवळ पूर्ण अंधारात विमान उडवत असताना, त्यांच्या खिडकीच्या बाहेर काही फूटांवर अचानक विजेचा कडकडाट झाल्याने वैमानिक स्तब्ध झाले होते.

मार्चमध्ये ऑस्टिनहून फ्रँकफर्टला जाणार्‍या लुफ्थांसा एअरलाइन्सच्या विमानावर वीज पडली. त्यात सीटबेल्डचे साइन बंद झाले. विमान 1000 फूट खाली घेण्यात आले. त्यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यावेळी सात लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …