DigiLocker मध्ये PAN-Aadhar-DL करा सेव्ह, नेहमी सोबत कॅरी करण्याची नाही पडणार गरज

नवी दिल्ली:DigiLocker App: डिजीलॉकरच्या मदतीने तुम्ही सगळे महत्वाचे डॉक्युमेंट्स कायम सोबत बाळगू शकता, ते सुद्धा सोबत कॅरी न करता. डिजीलॉकर ही भारत सरकारची क्लाउड स्टोरेज सेवा आहे, ज्यामध्ये भारतातील नागरिक त्यांचे महत्त्वाचे दस्तऐवज सेव्ह करू शकतात. ही कागदपत्रे सेव्ह करण्या सोबतच, तुम्ही डिजीलॉकरवर त्यांची पडताळणी देखील करू शकता. उदाहरण द्यायचे झाल्यास, जर Driving Licence तुमच्या डिजीलॉकरमध्ये असेल, तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत सोबत ठेवण्याची ठेवण्याची गरज नाही. डिजीलॉकरवरूनच तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स ट्रॅफिक पोलिसांना दाखवू शकता. तसेच, मार्कशीट, प्रमाणपत्रे, ओळख पुरावे यांसारखी महत्त्वाची कागदपत्रेही सेव्ह करू शकता.

वाचा: या ऑफरने ग्राहकांना लावले वेड, Nokia चा पॉप्युलर स्मार्टफोन चक्कं ६० रुपयांत खरेदी करण्याची संधी

डिजीलॉकरमध्ये कागदपत्रे कशी सेव्ह करायची?

सर्वप्रथम डिजिलॉकर अॅप उघडा. DigiLocker Account मध्ये साइन इन विभाग उघडेल. तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांक किंवा आधार क्रमांकासह लॉगिन करा. तुमचा नोंदणीकृत फोन नंबर, OTP प्रविष्ट केल्यानंतर लॉगिन बटणावर टॅप करा. डिजिलॉकरच्या प्रथमच युजर्सना ६ अंकी सुरक्षा पिन सेट करावा लागेल. यानंतर या पिनने लॉगिन करावे लागेल.

हेही वाचा :  जन्म-मृत्यू नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक आहे का?, सरकारचा महत्त्वाचा निर्णय

वाचा: आवडता शो मिस होणार नाही, या प्लान्समध्ये फ्री मिळतेय Netflix आणि Disney+ Hotstar

डिजीलॉकर अॅपच्या होम पेजवर तुम्हाला ‘सर्च’ पर्याय दिसेल. तुम्हाला सेव्ह करायचे असलेले कोणतेही दस्तऐवज शोधा. आता तुम्हाला दस्तऐवज क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील एंटर करावे लागतील. आता तुम्हाला ‘Get Document’ बटणावर क्लिक करावे लागेल. तुमच्या दस्तऐवजाचे सर्व तपशील अॅपवर पसरवले जातील. तुम्हाला अॅपच्या ‘माय इश्यूड डॉक्युमेंट्स’ विभागात दस्तऐवज दिसेल

डिजीलॉकरवरील डॉक्युमेंट्स असे शेयर करा:

डिजिलॉकमध्ये सेव्ह केलेले डॉक्युमेंट तुम्ही सहज शेअर करू शकता. त्यासाठी प्रथम DigiLocker अॅप उघडा. आणि साइन इन करा. ‘जारी’ पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला 3 डॉट पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि डॉक्युमेंट उघडावे लागेल. यानंतर तुम्हाला शेअर पर्यायावर क्लिक करावे लागेल, तुम्हाला ज्या प्लॅटफॉर्मवर शेअर करायचे आहे ते निवडा. तुम्ही तुमच्या सोयीसाठी Email, WhatsApp , Facebook आणि इतर प्लॅटफॉर्मवरही शेअर करू शकता.

वाचा: प्रीमियम स्मार्टफोन खरेदीत बजेटची अडचण ? पाहा ही डील, ७५ हजारांचा 5G Samsung फोन मिळतोय २० हजारात

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पेट्रोलची टाकी फूल केल्यास स्फोट होतो? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य

Viral News : पेट्रोलची टाकी फूल केली तर स्फोट होऊ शकतो असा दावा करणारा व्हिडिओ …

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …