Midcap Stocks मधून कमी कालावधीत कमवा तुफान Returns, तुम्ही पैसे गुंतवले का?

Midcap Stocks: सध्या शेअर बाजारात (share market) चांगली उसळी पाहायला मिळते आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष राहिले आहे ते स्टॉक्सवरती (stocks). सध्या असे अनेक स्टॉक्स आहेत ज्यात तुम्ही चांगल्या तऱ्हेने इन्व्हेसमेंट करू शकता. आजकाल चर्चा आहे ती मिडकॅप इंडेक्सची. मिडकॅप (midcap) इंडेक्स शेअर्समधून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. तुम्हाला जर चांगले आणि जास्त रिटर्न्स (Returns) हवे असतील तर मिडकॅप स्टॉक हा चांगला पर्याय आहे. तेव्हा कमीत कमी वेळेत जास्त नफा मिळवायचा असेल तर या खास 6 मिडकॅप स्टॉक्समध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, असे काही स्टॉक्स आहे. ज्यातून तुमचा पोर्टफोलियो चांगल्या प्रकारे तयार होऊ शकतो. आयआरएफसी (IRFC), प्राज इंडस्ट्रीज (Praj Industries), दिल्लीवेरी लिमिटेड (Delhivery Limited), सुप्रीम इंडस्ट्रीज (Supreme Industries), एनसीसी लिमिटेड (NCC Limited) आणि टीव्हीएस श्रीचक्र (TVS Shreechakra) यांचा समावेश आहे. या स्टॉक्सची लक्ष्य किंमत (target price) आणि स्टॉपलॉस (stop loss) जाणून घेऊया. अल्पकालीन, स्थिती आणि दीर्घ मुदतीसाठी, स्वतंत्र बाजार विश्लेषक अंबरीश बालिगा या 3 मिडकॅप स्टॉक्सवर पैज लावण्याची शिफारस करतात. 

1. अल्पकालीन (short term) – आयआरएफसी (IRFC) : या स्टॉकची सध्याची पातळी 31 च्या आसपास आहे. स्टॉकने त्याच्या यापूर्वीचे लक्ष्य गाठले आहे तेव्हा यंदी त्याची लक्ष्य किंमत (Target Price) 35 ठेवण्यात आली आहे. या समभागाने (share) 80 पैसे लाभांशही दिला आहे. 

हेही वाचा :  ट्युशनला जाणाऱ्या मुलीचे अपहरण, मुख्यमंत्र्यांनी केला हस्तक्षेप आणि...

2. पोझिशनल टर्म (positional term) – प्राज इंडस्ट्रीज (Praj Industries) : तुम्ही गुंतवणूकीसाठी (investment) प्राज इंडस्ट्रीजची निवड करू शकता. ही कंपनी इथेनॉल वनस्पतीचं उत्पादन करते. देशांतर्गत बाजारपेठेत (Market Share) या कंपनीचा सुमारे 65 टक्के हिस्सा आहे. या कंपनीची सध्याची पातळी 391 च्या आसपास आहे. या शेअरची लक्ष्य किंमत (target prize) 480 ठेवण्यात आली आहे.

3. दीर्घकालीन (long term) – दिल्लीवेरी लि. (Delhivery Ltd): दिल्लीवरी ही देशातील सर्वात वेगाने वाढणारी एक्सप्रेस लॉजिस्टिक प्लेअर कंपनी आहे. लॉजिस्टिकची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. दीर्घ मुदतीसाठी या शेअरची तुम्हीही निवड करू शकता. या कंपनीची सध्याची पातळी सुमारे रु.332 आहे तर लक्ष्य किंमत (target price) 625 रुपये ठेवण्यात आली आहे.

MSFL चे जय ठक्कर अल्पकालीन, स्थिती आणि दीर्घ मुदतीसाठी 3 सर्वोत्तम मिडकॅप स्टॉक्स सुचवतात. 

1. शॉर्ट टर्म (short term) – सुप्रीम इंडस्ट्रीज (Supreme) – अल्पावधीसाठी सुप्रीम इंडस्ट्रीजची निवड केली आहे. 2304 च्या आसपास ट्रेडिंग या कंपनीचे ट्रेडिग आहे. या शेअरची लक्ष्य किंमत (target price) 2700/2900 राहील तर स्टॉपलॉस 2130 असेल. 

हेही वाचा :  '5 दिवस ऑफिसला येण्याचा ट्रेंड...', नारायणमूर्तींमुळे गदारोळ सुरु असतानाच हर्ष गोयंका यांचं मोठं विधान

2. पोझिशनल टर्म (positional term) – एनसीसी लिमिडेट (NCC Ltd) –  हा शेअर 80-81 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. हा शेअर तुम्ही 107-115 साठी खरेदी करा आणि रूपये 68 चा स्टॉपलॉस ठेवा. स्टॉक थोडा अस्थिर आहे परंतु अलीकडे सोनेरी क्रॉसओवर दर्शविला आहे. डाऊन सायकल (down cycle) संपल्यानंतर आता नवीन अपसायकल (upcycle) सुरू होत आहे. 

3. दीर्घकालीन (long term)  – टीव्हीएस श्रीचक्र (TVS ShreeChakra) – टायर कंपनी टीव्हीएस श्रीचक्र सध्या ट्रेण्डिंग आहे. या स्टॉकची किंमत सुमारे 3230 आहे. या शेअरचे कंझर्व्हेटिव्ह लक्ष्य (conservative target price) देखील 4800 च्या आसपास आहे. या स्टॉकची लक्ष्य किंमत (target price) 4800 ठेवली आहे आणि स्टॉपलॉस 2500 वर ठेवला जाईल.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …